ETV Bharat / state

Sanjay Raut criticized Devendra Fadnavis: कलंकित सरकारमध्ये फडणवीस अंगाला हळद लावून बसलेत - खासदार संजय राऊत

महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर एका बाजूला शरद पवार महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी दौऱ्यावर निघाले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे देखील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. नुकतेच विदर्भ दौऱ्यावरून आलेल्या उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आज गुजरातचे माजी मुख्यमंत्री मातोश्रीवर येणार आहेत. महाराष्ट्रातील या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

MP Sanjay Raut
खासदार संजय राऊत
author img

By

Published : Jul 11, 2023, 1:12 PM IST

मुंबई : उद्धव ठाकरे पक्ष बांधणीसाठी दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्या सभा देखील झाल्या. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे हे दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर होते. यवतमाळ, पोहरादेवी, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांच्या दौऱ्यात विदर्भाच्या जनतेने उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांचे मिळावे, पदाधिकाऱ्यांचे मेळावे, बैठका असा हा एकूण दौरा झाला.

महाराष्ट्रात कलंकित सरकार : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कलंकित सरकार स्थापन झालेले आहे. हे आम्ही नाही तर केंद्राच्या तपास यंत्रणांनी सांगितलेले आहे. पीएमएलए कायद्यात स्पष्ट म्हटलेले आहे. जर एखाद्या कलंकीत खात्यातून गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा हा दुसऱ्या खात्यात गेला असेल, तर पीएमएलए कायद्याअंतर्गत तो देखील गुन्हेगार ठरतो. याच कायद्याअंतर्गत आणि अशाच आरोपांखाली अनेकजण आजही तुरुंगात आहेत. आज या सरकारमध्ये फक्त कलंकित खातेच नाही, तर कलंकित खात्यामध्ये पैसे वळविणारे देखील सामील झालेले आहेत. 14 ते 15 लोकांवर इडीच्या कार्यवाही सुरू आहे. हे संपूर्ण सरकार कलंकित आहे.

गंभीर राजकीय स्वरूप : देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले की, इतक्या गंभीर राजकीय स्वरूपाचा कलंकित महाराष्ट्र यापूर्वी कधीही झाला नव्हता. एका दुसऱ्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील. आरोप प्रत्यारोप होत असतात. पण, थेट गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा घेऊन सरकारमध्येच सामील होणे अशा प्रकारचा राजकीय खेळ महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता. इतक्या कलंकीत सरकारमध्ये स्वच्छ चारित्र्याचे देवेंद्र फडणवीस अंगाला हळद लावून बसले आहेत. पण ती हळद पिवळी नसून काळी आहे. भारतीय जनता पक्षाचे चारित्र्यवान नीतिमत्तेच्या गप्पा मारणारे नेते आज शिंदेंच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावरच यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

मोदी यांच्याबाबत आदर : लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्याबाबत आमच्या मनात आदर आहे. पण, मी त्यांना नक्कीच टिळकांचे चरित्र वाचायला देईन. टिळकांचा संघर्ष, टिळकांची लोकशाही विषयी असलेली भूमिका या सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. पुरस्कार देणाऱ्यांनी आणि पुरस्कार देणाऱ्यांनी सुद्धा ही समजून घ्यायला हवी, असे राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis: भाजप म्हणजे राजकारणातील 'सिरीयल किलर आणि बलात्कारी'- संजय राऊत यांची गंभीर टीका
  2. Sanjay Raut Criticizes BJP: महाराष्ट्रातील सत्ता ही देश बुडव्यांच्या हाती गेली आहे - खासदार संजय राऊत
  3. Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस इतिहासातील सर्वात कमजोर गृहमंत्री- संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.