मुंबई - राज्यात नव्याने सत्ता स्थापन करण्यासाठी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे समीकरण जुळण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अहमद पटेल यांच्यासोबत बैठक झाली असल्याची बातमी माध्यमांमध्ये फिरत होती. मात्र, संजय राऊत यांनी अशी कुठल्याच प्रकारची भेट झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
-
शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे के साथ अहमद पटेल जी की मीटिंग हुई और हमे कुछ वादे किये गये ऐसी बाते मिडीया के जरिये फैलाई जा रही है , मैं उद्धवजी की तरफ से ये बात साफ कर देना चाहता हूं की ऐसी कोई मुलाकात नही हुई ,हमारी बातचीत कांग्रेस और एनसीपी के साथ चल रही है.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे के साथ अहमद पटेल जी की मीटिंग हुई और हमे कुछ वादे किये गये ऐसी बाते मिडीया के जरिये फैलाई जा रही है , मैं उद्धवजी की तरफ से ये बात साफ कर देना चाहता हूं की ऐसी कोई मुलाकात नही हुई ,हमारी बातचीत कांग्रेस और एनसीपी के साथ चल रही है.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 13, 2019शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे के साथ अहमद पटेल जी की मीटिंग हुई और हमे कुछ वादे किये गये ऐसी बाते मिडीया के जरिये फैलाई जा रही है , मैं उद्धवजी की तरफ से ये बात साफ कर देना चाहता हूं की ऐसी कोई मुलाकात नही हुई ,हमारी बातचीत कांग्रेस और एनसीपी के साथ चल रही है.
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 13, 2019
अहमद पटेल व उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून काँग्रेसने शिवसेनेला आश्वास्त केले. या प्रकारच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरत आहेत. सत्तास्थापनेसंबधीत अनेक तर्क लावले जात होते. मी उद्धव यांच्यावतीने स्पष्ट करतो की, या प्रकारची कोणतीच बैठक उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्या दरम्यान झाली नसून आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत, असे संजय राऊत यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. त्यांनी या आशयाचे टि्वट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये केले आहे.
संजय राऊत यांच्या छातील दुखत असल्याने त्यांना सोमवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी लिलावती रूग्णालयात त्यांच्यावर अँजिओग्राफी आणि त्यानंतर अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यांच्या हृदयात 2 ब्लॉक असल्याचे निदान झाले होते.