ETV Bharat / state

Sameer Wankhede News: अतिक अहमद सारखी घटना होण्याची समीर वानखेडेंना भीती; मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणार विशेष सुरक्षा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये चौकशी करत असतानाच बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याप्रकरणी सीबीआयने तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू केलेली आहे. तसेच समीर वानखेडे यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव देखील घेतलेली आहे. त्याची आज सुनावणी आहे. तसेच सीबीआयच्या कार्यालयात देखील त्यांची चौकशी सुरू आहे. परंतु त्यांना सुरक्षा हवी आहे, म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांकडे ते आता सुरक्षेची मागणी करणार आहेत.

Sameer Wankhede
समीर वानखेडे
author img

By

Published : May 22, 2023, 10:20 AM IST

Updated : May 22, 2023, 12:14 PM IST

मुंबई : कॉर्डेलिया क्रूजवर कथित आर्यन खान ड्रग प्रकरणांमध्ये नवीन वळण समोर आलेले आहे. आर्यन खानचे नाव शेवटच्या वेळी आरोपींच्या यादीत टाकले, असा मोठा दावा त्या संदर्भातील चौकशी अधिकाऱ्याकडूनच केला गेलेला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने याबाबत समीर वानखेडे यांना दिलासा दिला. मात्र मुंबई उच्च न्यायालयात याबाबत दावा दाखल करावा, असे म्हटले होतो. त्यामुळे सुट्टीकालीन न्यायालयात आज समीर वानखेडे यांनी दावा दाखल केला. अतिक अहमद सारखी घटना आपल्यासोबत होण्याची भीती समीर वानखेडे यांना आहे, त्यामुळे त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षा पुरवण्याची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

  • #WATCH | Mumbai: "I'm getting threats continuously for the last 4 days. Will share everything with the Police Commissioner...": Sameer Wankhede, Former Zonal Director of Mumbai NCB pic.twitter.com/l4IuqFjNlo

    — ANI (@ANI) May 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चौकशी आणि तपासासाठी सहकार्य करावे : मुंबई उच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती आरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये 22 मे 2023 पर्यंत जबरदस्तीने कोणतीही अटक सीबीआयने समीर वानखेडे यांना करू नये. तसेच चौकशी आणि तपासासाठी समीर वानखेडे यांनी देखील सहकार्य करावे, असे आपल्या निर्देशात म्हटले आहे. आज त्यांच्या अटकेपासून संरक्षणाची तारीख संपत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात त्यांची सुनावणी होणार आहे. तसेच त्यांना सीबीआय कार्यालयामध्ये नित्य नियमाने चौकशीसाठी जावे लागत आहे.

सुरक्षेची मागणी करणार : परंतु ज्या रीतीने सीबीआयकडून रोज पाच ते सहा तास समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यांना असे वाटते आहे, की अतिक अहमदवर हल्ला झाला होता. तसाच समीर वानखेडे यांच्यावर देखील होऊ शकतो. म्हणून समीर वानखेडे हे आपल्या सुरक्षेसाठी आता मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याकडे ते सुरक्षेची मागणी करणार आहेत. आजच्या सुनावणीमध्ये न्यायालय काय निर्देश देते? ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. आर्यन खान प्रकरणात २५ कोटींची मागणी आणि भ्रष्टाचार, बेहिशोबी मालमत्ता असे आरोप असलेल्या समीर वानखेडे यांची रविवारी सीबीआयने तब्बल पाच तास चौकशी झाली.

हेही वाचा :

  1. Sameer Wankhede CBI Inquiry : समीर वानखेडेंची दुसऱ्या दिवशीही सीबीआयकडून पाच तास चौकशी; म्हणाले, न्याय व्यवस्थेवर विश्वास....
  2. CBI Raid On Sameer Wankhede : 25 कोटी लाचप्रकरण; समीर वानखेडेंच्या घरी दुसऱ्या दिवशीही सीबीआयची छापेमारी
  3. CBI Raid On Sameer Wankhede House : समीर वानखेडे यांच्या घरावर 'सीबीआय'ची छापेमारी, भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल

Last Updated : May 22, 2023, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.