ETV Bharat / state

45 मिनिटात कोरोनाची चाचणी करणाऱ्या 10 मशीन अडकल्या निविदा प्रक्रियेत - corona test system

किचकट प्रक्रिया आणि प्रतीक्षेत असलेल्या निविदा तत्काळ उघडत निर्णय घ्यावा. जेणेकरून या सर्व 10 स्वयंचलित आरएनए शुद्धीकरण प्रणाली मशीनचा फायदा राज्यास होऊ शकतो, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

RTI activist Anil Galgali
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली
author img

By

Published : Apr 5, 2020, 6:39 PM IST

मुंबई - संपूर्ण देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रातसुद्धा परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा वेळी 45 मिनिटांत कोरोनाची चाचणी करणारी आरएनए शुद्धीकरण प्रणाली (Automated RNA Purification System) मशीन ही निविदा प्रक्रियेत अडकली आहे. या निविदेकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.

त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे, की संपूर्ण राज्यात अशा 10 स्वयंचलित आरएनए शुद्धीकरण प्रणाली (Automated RNA Purification System) मशीन खरेदी करण्यासाठी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ (मर्यादित)तर्फे 14 मार्च 2020 रोजी ई-निविदा जारी केल्या होत्या. ज्याचा निर्णय 27 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार होता. एका मशीनसाठी अंदाजे 15 लाख खर्च आहे. महाराष्ट्र राज्याला अशा १० मशीनची आवश्यकता आहे.

एकावेळी 24 नागरिकांच्या चाचणी करण्याची क्षमता असलेल्या मशीन 45 मिनिटात अहवाल देण्यात सक्षम आहे. अहवाल तत्काळ न मिळाल्याने 2 ते 3 दिवस संपूर्ण यंत्रणा ताटकळत राहते. पॉझिटिव्ह असल्याच्या माहितीचा अहवाल वेळेत प्राप्त न झाल्यामुळे ताणही वाढतो. वैद्यकीय संचालनालयतर्फे तत्काळ निधी हाफकिनकडे वळवण्यात येणे आवश्यक असताना मंत्रालयातील अधिकारी निर्णय घेण्यास वेळखाऊ धोरण अवलंबल आहेत. किचकट प्रक्रिया आणि प्रतीक्षेत असलेल्या निविदा तत्काळ उघडत निर्णय घ्यावा. जेणेकरून या सर्व 10 स्वयंचलित आरएनए शुद्धीकरण प्रणाली मशीनचा फायदा राज्यास होऊ शकतो, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.