ETV Bharat / state

‘मुंबई सागा’च्या निर्मात्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोटीस! - rss mumbai news

चित्रपटातील काही दृश्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश दाखवल्यामुळे संघाबद्दल गैरसमज पसरवून त्याची प्रतिमा मलीन केली जात आहे, असा आरोप स्वयंसेवक भिंगार्डे यांनी केला आहे. ह्या दृश्यामुळे संघ स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

rss issues notice to producers of Mumbai Saga
‘मुंबई सागा’ च्या निर्मात्यांना राष्ट्रीय सवयंसेवक संघाची नोटीस!
author img

By

Published : Jun 2, 2021, 9:01 PM IST

मुंबई - नजीकच्या काळात चित्रपटसृष्टीला अनेक सामाजिक संस्थांच्या आक्षेपाला सामोरे जावे लागताना दिसत आहे. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’ ला झालेला करणी सेनेचा विरोध आठवत असेलच. नुकताच यशराज फिल्म्स ला ‘पृथ्वीराज’ चित्रपटासंदर्भात एक नोटीस पाठविण्यात आल्याचे कळतेय आणि आता ‘लॉ मराठी’ या पोर्टलच्या वृत्तानुसार राष्ट्रीय सवयंसेवक संघाच्या वतीने नुकताच प्रदर्शित होऊन गेलेला हिंदी चित्रपट ‘मुंबई सागा’ चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि त्यातील संबंधितांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बदनामीकारक चित्रण केल्याप्रकरणी नोटीस पाठविण्यात आली आहे. ‘मुंबई सागा’ १९ मार्च २०२१ला चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला होता आणि त्याचे कथानक मुंबईतील ८०-९०च्या दशकातील गॅंग-वॉर वर आधारित आहे. यात गॅंगस्टर्स-राजकारणी-पोलीस यांच्या संगनमताने त्याकाळी होणाऱ्या गुन्ह्यांचे उदात्तीकरण केल्यासारखे जाणवते.

चित्रपटातील 'या' दृश्यावर आक्षेप
मुंबई राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे सवयंसेवक महेश भिंगार्डे यांनी ‘मुंबई सागा’ चे लेखक-दिग्दर्शक संजय गुप्ता आणि सर्व निर्मात्यांच्या नावे नोटीस पाठविली आहे. या चित्रपटातील एका दृश्यात राष्ट्रीय सवयंसेवक संघाच्या गणवेशातील व्यक्तीचा फोटो दाखवत तो एका सेनेचा सदस्य असल्याचे सांगण्यात आले असून ‘भाऊ’ शी संबंधित असल्याचे दाखविले आहे. ही व्यक्ती मुंबई पोलीस दलात महत्वाची पदे बळकावत असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे पोलीस दलातच वेगळा गट व ‘भाऊ’ ची खास सेना तयार झाल्याचे सूचित करण्यात आले आहे. चित्रपटातील काही दृश्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश दाखवल्यामुळे संघाबद्दल गैरसमज पसरवून त्याची प्रतिमा मलीन केली जात आहे, असा आरोप स्वयंसेवक भिंगार्डे यांनी केला आहे. ह्या दृश्यामुळे संघ स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू - महेश भिंगार्डे

गेल्या काही वर्षांत बायोपिक आणि सत्य घटनांवर आधारित कथानकांवर चित्रपट बनविण्याची टूम निघाली आहे. प्रेक्षकांना भूतकाळातील प्रसिद्ध आणि (कुप्रसिद्ध) व्यक्ती आणि घटनांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता हे यामागील प्रमुख कारण. अर्थातच अशा कथाकथन करताना त्यात नाट्य हवे म्हणून ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ च्या अनुषंगाने काही काल्पनिक घटना घालण्यात येतात. परंतु या ‘सिनेमॅटिक लिबर्टी’मुळे कोणत्या व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या भावना दुखावू नये ही लेखक-निर्माते-दिग्दर्शक यांची जबाबदारी असते आणि त्याच्या मर्यादा ओलांडल्या गेल्या की खडाष्टकं होतात. त्यानुसारच मुंबई राष्ट्रीय सवयंसेवक संघाचे सवयंसेवक महेश भिंगार्डे यांनी चित्रपटाच्या चमूला कायदेशीर नोटीस बजावली आहे. चित्रपटातून ही बदनामीकारक दृश्ये आणि सर्व संवाद काढून टाकावेत, तसेच वृत्तवाहिन्यांवरून जाहीर माफी मागावी अन्यथा आपण कायदेशीर कारवाई करू असे या नोटिशीत म्हटले आहे.

हेही वाचा - 36 वर्षे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याला परिवहन मंत्र्यांकडून कौतुकाची थाप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.