मुंबई - सुमारे १५ दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. ती अखेर मागे घेण्यात आली आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याच्या वर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा- माजी खासदार दादा पाटील शेळके काळाच्या पडद्याआड, आज अंत्यसंस्कार
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. त्यांनंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.