ETV Bharat / state

..तरच कीर्तिकरांचा मार्ग सूकर; मराठी-हिंदी भाषिकांची मते ठरणार निर्णायक

अंधेरी पूर्व, जोगेश्वरी व गोरेगाव पूर्व-पश्चिम पट्ट्यात उत्तर भारतीय व मुस्लिम समाजाचे प्रमाणही अधिक आहे. उत्तर भारतीय व मुस्लिम समाजाची मते काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

author img

By

Published : Apr 25, 2019, 12:09 PM IST

संजय निरुपम, गजान कीर्तीकर

मुंबई - पश्चिम उपनगरांतील झपाटयाने विकसित झालेला भाग अशी उत्तर पश्चिम मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गुरूदास कामत यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची तगडी फौजही २०१४ मध्ये मोदी लाटेला थोपवू शकली नाही.

शिवसेनेचे गजानन कीर्तिकर तब्बल एक लाख ८३ हजारांचे मताधिक्य घेत विजयी झाले होते. आता पुन्हा कीर्तिकरांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. कीर्तीकरांसमोर आघाडीकडून काँग्रेसचे संजय निरुपम निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.

मराठी-हिंदी भाषिकांची मते ठरणार निर्णायक

पक्षिय बलाबल-
एकीकडे अंधेरी ते गोरेगाव पट्ट्यात वसलेले बंगले तर दुसरीकडे झोपडपट्टी असे या मतदारसंघातील चित्र आहे. वर्सोवा परिसरातील कोळीवाडे, अंधेरी पूर्वेकडील गावठाण परिसर, नेहमीच चर्चेत राहिलेला आरेचा हरित पट्टा ही याच भागाची ओळख. अंधेरी पूर्व-पश्चिम, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी आणि जोगेश्वरी पूर्व या सहा विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. सहापैकी जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, अंधेरी पूर्व हे तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. तर गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे.

मतदारसंघातील प्रश्न-
एकीकडे अंधेरी ते जुहू दरम्यान मेट्रोला विरोध होत असून अंतर्गत मेट्रोची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. दिंडोशी ते जेव्हीएलार पर्यंतचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.

मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. मात्र, आता चित्र थोडेसे बदलले आहे. यंदा उत्तर पश्चिममधून कीर्तीकर विरोधात निरुपम यांच्यात अटीतटीची लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ओशिवरा, अंधेरी लोखंडवाला परिसरात सेलिब्रिटी, उच्चभ्रू वर्ग मोठया संख्येने वसला आहे. तर गोरेगाव पूर्व पश्चिम, जोगेश्वरी, दिंडोशी परिसरात मोठ्या संख्येने मराठी मतदारही आहे.

अंधेरी पूर्व, जोगेश्वरी व गोरेगाव पूर्व-पश्चिम पट्ट्यात उत्तर भारतीय व मुस्लिम समाजाचे प्रमाणही अधिक आहे. उत्तर भारतीय व मुस्लिम समाजाची मते काँग्रेसला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र संजय निरुपम हे बिहारचे असल्याने त्यांना उत्तर भारतीयांची मते मिळणार का याबाबत साशंकता आहे.

विकासकामांच्या श्रेयवादातून स्थानिक शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते नेहमी एकमेकांशी भिडत राहिले. भाजप आमदार भारती लव्हेकर आणि अमित साटम यांच्याशी कीर्तिकर आणि शिवसैनिकांचा संघर्ष होतच राहिला. या सर्वांचा परिणाम येत्या लोकसभेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. युती झाली तरी कीर्तिकरांसमोर भाजप नेत्यांशी जुळवून घेण्याचे मोठे आव्हान आहे. भाजपसोबत असलेला मराठी आणि उत्तर भारतीय मतदार मैदानात उतरला तरच कीर्तिकरांचा मार्ग सूकर होणार आहे.

बिहारी पार्श्वभूमीमुळे अन्य हिंदी भाषिक निरूपम यांना आपलेसे मानत नाहीत. तर बसपाकडून उत्तर प्रदेशचे आमदार असलेले सुनील पासी यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. याचा फटका निरुपम यांना बसू शकतो.

भाजपचे विधानसभेत तीन आमदार आहेत. पालिकेतील संख्याबळ तीनवरून थेट २१ वर नेत या मतदारसंघावर अपले वर्चस्व राखले आहे.

2014 लोकसभा निवडणूकितील परिस्थिती..
उमेदवार पक्ष मिळालेली मते
गजानन कीर्तीकर (शिवसेना) ४ लाख ६४ हजार ८२०
गुरुदास कामत (काँग्रेस) ०२ लाख ८१ हजार ७९२
महेश मांजरेकर (मनसे) ६६ हजार ८८
मयांक गांधी (आप) ५१ हजार ८६०
नोटा - ११ हजार ०९

Intro:उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आढावासाठी युतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर, आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांचा 121 अपलोड केलं आहे.

Body:यासोबत shorts जोडले आहेत.

Conclusion:याची स्क्रिप्ट मोजोवेबवरून अपलोड होईल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.