ETV Bharat / state

Resident Doctors Strike : निवासी डॉक्टरांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरू, लेखी आश्वासन दिल्याशिवाय माघार नाही - संपकरी डॉक्टर

2 जानेवारीपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. आज दुसऱ्या सलग दिवशीही डॉक्टरांचा संप सुरू (Resident Doctors Strike) आहे. लेखी आश्वासन दिल्याशिवाय माघार नाही, अशी माहिती संपकरी डॉक्टरांनी दिली आहे. सोमवारपासून सात हजार निवासी डॉक्टरांचे काम बंद आंदोलन सुरू (doctors strike continued on second day) आहे.

Resident Doctors Strike
डॉक्टरांचा संप
author img

By

Published : Jan 3, 2023, 1:17 PM IST

प्रतिक्रिया देताना संपकरी डॉक्टर

मुंबई : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल सोमवारपासून राज्यातील सात हजार निवासी डॉक्टर संपावर गेले (Resident Doctors Strike) आहेत. या संपात पालिका रुग्णालयातील दोन हजार निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. आज दुसऱ्या दिवशी पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी केईएम रुग्णालयात निदर्शने (Protest in KEM Hospital Mumbai) केली. यावेळी जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही, अशी माहिती संपकरी डॉक्टरांनी दिली. महागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, वसतीगृहाच्या समस्या, मुंबई महानगरपालिकेकडून दर महिन्याला मिळणारा प्रलंबित कोविड भत्ता या कारणांमुळे राज्यभरात सोमवारपासून सात हजार निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केले आहे.

संपाचा परिणाम : मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आदी रुग्णालयांमधील २ हजार डॉक्टर्स या संपात सहभागी झाले आहेत. याचा परिणाम रुग्ण सेवेवर दिसून येत आहे. निवासी डॉक्टर नसल्याने पालिका रुग्णालयातील ओपीडी आणि वॉर्डमधील सेवा बंद असल्याची माहिती डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने दिली (doctors strike continued on second day) आहे.

१५ दिवसात प्रश्न सोडवू : एकीकडे निवासी डॉक्टरांचा संप सुरू असताना पालिका प्रशासनाने त्याचा कोणताही मोठा परिणाम रुग्ण सेवेवर झाला नसल्याचे म्हटले आहे. निवासी डॉक्टरांचा कोवीड भत्ता तसेच वसतीगृहाचा प्रश्न येत्या १५ दिवसात मार्गी लावला जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी (resident doctors strike continued) दिली.

लेखी आश्वासन दिल्याशिवाय माघार नाही : दरम्यान आज पालिकेच्या केईएम रुग्णालयात संपकऱ्या डॉक्टरांनी आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी निदर्शने केली. आमच्या मागण्या गेल्या सहा महिन्यांपासून राज्य सरकार आणि पालिका प्रशासनापुढे मांडल्या आहेत. मात्र त्यानंतरही आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आंदोलन करावे लागले आहे. आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्या असे ऐकत आहोत, मात्र असे सरकार आणि पालिकेने लेखी दिलेले नाही. यामुळे जोपर्यंत लेखी आश्वासन दिले जात नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संपकरी डॉक्टरांनी (resident doctors Protest in KEM Hospital) सांगितले.

सरकारने दखल घेतली नाही : मागील एक वर्षांपासून संघटनेने विविध स्तरावर महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या समस्या मांडून शासन व प्रशासनास माहिती करून देण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, संबंधित विभागाचे सचिव आयुक्त व संचालक यांच्यासोबत संघटनेच्या अनेक बैठकी झाल्या. या बैठकीदरम्यान प्रामुख्याने समस्या व मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप दखल नाही घेतली असे मार्ड या निवासी डॉक्टर संघटनेचे म्हणणे (doctors strike continued on second day) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.