मुंबई : सणासुदीचा हंगाम सुरू झाला ( festival season started ) आहे. सणांचे धार्मिक महत्त्व आहे परंतू सण नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि कुटुंबासोबत खूप अविस्मरणीय वेळ घालवण्याची एक उत्तम संधी देखील देतात. एकट्या महिलाच सर्व काही करू शकत नाहीत. पतिचीही तितकीच साथ हवी. कोणतेही नाते घट्ट होण्यासाठी वेळ लागतो. जोडीदाराशी नाते सुंदर करण्यासाठी वेळ आणि थोडासा प्रयत्न पुरेसा असतो. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत ( Diwali festival ) घालवलेले क्षण खास आणि आनंदी बनवायचे असतील तर या सणासुदीच्या काळात तुमच्या जोडीदारासोबत काही खास उपक्रम आखा.
सोबत शोपींगला जा : सणासुदीच्या काळात भरपूर खरेदी करावी ( Shopping ) लागते. पूजेच्या साहित्यापासून ते सजावटीपर्यंत आणि कुटुंबासाठी कपडे, खाण्यापिण्याचे साहित्य, भेटवस्तू वगैरे घ्यावे लागतात. जोडीने एकत्र शॉपिंग करून मजेदार क्षण घालवू शकतात. खूप मोठे बजेट आणि भरपूर पैसा खर्च केला पाहिजे असे नाही. अगदी बाजारात जोडीने फिरूनही तुम्ही मूड फ्रेश करू शकतात. चालता-चालता भेळ, आईस्क्रीम, चॉकलेट यांसरख्य़ा स्ट्रीट फूडचाही आस्वाद तुम्ही जोडीदारासोबत घेऊ शकता. प्रेमाने घालवलेले क्षण कधीच कोणी विसरत नाही.
फराळ बनवण्यात मदत करा : सणाच्या वेळी स्वयंपाकघरात विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ शिजवले जातात. जर पाहूण्यांसाठी काही खास बनवून ठेवायचे असेल आणि घरात कोणीच नाही आणि जेवण बनवण्याची वेळ तुमच्यार आली तर ही एक सूवर्ण संधी असेल. जोडप्याला काही मजेदार क्षण एकत्र घालवायचे असतील तर ते स्वयंपाकघरात काही खास पदार्थ बनवू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराचे आवडते पदार्थ घरी शिजवू शकता. आपण एकत्र शिजवू शकता.
कार्यक्रमात सहभागी व्हा : उत्सवादरम्यान तुमच्या शहरात कोणत्याही प्रकारची जत्रा, उत्सव किंवा कार्यक्रम आयोजित केला असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तेथे जाऊ शकता. अशा कार्यक्रमांमध्ये तुम्ही तुमचे बालपणीचे दिवस आठवू शकता आणि तुमच्या जोडीदारासोबत मजा करू शकता. सणाच्या दरम्यान, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला आणि कुटुंबाला पूर्ण वेळ देत असेल, तेव्हा हा क्षण त्यांच्यासाठी खास बनवा. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी सरप्राईज प्लॅन करू शकता. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पार्टनरला सरप्राईज गिफ्ट देऊ शकता.