ETV Bharat / state

Top News : एका क्लिकवर वाचा, दिवसभरातील आजच्या महत्त्वाच्या बातम्या - दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब

आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) घेवू. देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या (Read Important top news) बातम्या वाचा.

Top News
आजच्या महत्त्वाच्या बातम्या
author img

By

Published : Nov 5, 2022, 7:47 AM IST

मुंबई : आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा (Top News Today) वाचा. रायगड जिल्ह्यातील नंदा म्हात्रे याही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत, संत नामदेवांच्या घुमान रथयात्रेचा फडणविसांच्या हस्ते प्रारंभ, दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब झाली आहे, उत्तर कोरिया क्षेपणास्त्रे वापरत असून संपूर्ण जगाला धोका निर्माण होण्याची चिंता भारताने संयुक्त राष्ट्रात व्यक्त केली या घटना दिवसभरात महत्त्वाच्या असणार आहेत.

नंदा म्हात्रे भारत जोडो यात्रेत सहभागी : रायगड जिल्ह्यातील नंदा म्हात्रे याही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार ( Nanda Mhatre participate Bharat Jodo Yatra ) आहेत. या पदयात्रेतून भारत समजून घेण्याची संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कन्याकुमारी पासून निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या चार राज्यांचा प्रवास करत तेलंगणात पोहोचली आहे. पेण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यापुर्वी निवडणूक लढवली आहे. कन्याकुमारीहून निघालेली ही यात्रा सध्या चार राज्यांचा दौरा करून तेलंगणात दाखल झाली आहे. यात्रेचा हा अनुभव समृद्ध करणार आहे. भारत समजून घेण्याची संधी यामुळे मिळत आहे. दररोज नवनवीन लोक भेटत आहेत. त्यांचे प्रश्न मांडत आहेत. त्यांचे प्रेम आणि पाठिंबा व्यक्त करत आहेत. हे खूप भारावून टाकणारे असल्याचे नंदा म्हात्रे सांगतात.

संत नामदेवांच्या घुमान रथयात्रेचा फडणविसांच्या हस्ते प्रारंभ : संत नामदेवांच्या घुमान रथयात्रेचा फडणविसांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. संत नामदेव महाराजांनी सातशे वर्षांपूर्वी प्रांत, भाषांची बंधने बाजूला ठेवून, पायी चालत संपूर्ण हिंदूस्थानात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला (Saint Namdev Mahataj Rath Yatra started by Fadnavis) होता. पंजाबमध्ये शीख धर्मात संत नामदेव महाराजांचे स्थान अढळ राहिले आहे. त्यांनी केलेल्या भागवत धर्माच्या प्रसाराला उजाळा देत पंढरपुरातून पंजाबमध्ये घुमानपर्यंत काढण्यात येणाऱ्या रथ व सायकल यात्रेतून पंढरपूर आणि घुमानचे नाते पुन्हा एकदा उजळून निघणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कमाल तापमानात वाढ : कोरडय़ा हवामानामुळे मुंबई आणि कोकण विभागासह राज्यात अन्यत्र दिवसाच्या कमाल तापमानात वाढ ( Increase temperature) झाली. थंडीच्या हंगामात म्हणजे नोव्हेंबरमध्ये ऑॅक्टोबरच्या उन्हाचे चटके बसू लागले आहेत. मुंबईसह कोकण विभाग, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. रात्रीचे किमान तापमान मात्र अद्यापही सरासरीखालीच असल्याने गारवा आहे. मात्र, त्यातही चढ-उताराची शक्यता आहे. दिवसाच्या कमाल तापमानातील वाढ आणखी चार ते पाच दिवस कायम राहणार आहे.

दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता आज सलग तिसऱ्या दिवशी खराब ( Poor air quality Delhi) राहिली. धुक्यांमुळे दृश्यमानता कमी आहे. हवेतील पीएम 2.5 पातळी वाढल्यामुळे लोकांना डोळ्यात जळजळ, घसा खवखवणे आणि श्वास घेण्यात अडचण यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेतील PM2.5 प्रदूषणापैकी 30 टक्के प्रदूषण हे वाहनांमुळे होते असे म्हटले. दिल्ली सरकारने एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनने (CAQM) शिफारस केल्यावर प्रदूषण-विरोधी निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये BS VI नसलेल्या डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी समाविष्ट आहे.

उत्तर कोरिया क्षेपणास्त्रे : उत्तर कोरिया क्षेपणास्त्रे वापरत असून दक्षिण कोरियासह संपूर्ण जगाला नवा धोका निर्माण करत ( north korea missile launch) आहे. उत्तर कोरियाकडून सातत्याने होत असलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणावर भारताने संयुक्त राष्ट्रात चिंता व्यक्त करत हा मुद्दा उपस्थित केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सांगितले की, उत्तर कोरियाने केलेले हे प्रक्षेपण सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन करणारे आहे. याचा परिणाम प्रदेश आणि त्यापलीकडील शांतता आणि सुरक्षिततेवर होत आहे. भारताने उत्तर कोरियाशी संबंधित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.