मुंबई - शेतकरी, बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यावरून लक्ष ( Unemployment inflation problem ) विचलित करण्यासाठी भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बदनामीचा ( BJP Chhatrapati Shivaji Maharaj ) घाट घातला जातो आहे. यापूर्वी दोन जन्मतारखेचा घोळ घालून छत्रपतींचा अवमान केला आहे. आता सतत वादग्रस्त विधाने सुरू आहेत. महाराष्ट्रातील जनता आणि काँग्रेस कदापि सहन करणार नाही. लवकरच महाविकास आघाडी राज्यपालांपासून प्रसाद लाड यांची तोंड गप्प केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे ( Congress spokesperson Atul Londhe ) यांनी दिला. तसेच पंतप्रधानांना ( Prime Minister ) याबाबत जाब विचारणार असल्याचे लोंढे म्हणाले.
शिवरायांचा अवमानकारक उल्लेख - भाजप नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवरायांचा अवमानकारक उल्लेख केला जातो आहे. राज्यपालांचे विधान ताजे असतानाच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाची तुलना महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले असताना आता भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी शिवछत्रपतींच्या जन्मस्थानाचे ठिकाण बदलून अकलेचे तारे तोडले. राष्ट्रवादीसह शिवसेनेकडून लाड यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेण्यात येतो आहे. आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे लाड यांच्या विधानावर जोरदार टीका केली.
छत्रपतींच्या बदनामीचे षडयंत्र - लोंढे म्हणाले की, महाराष्ट्रात शिवछत्रपतींचा बदनामीचा घाट भाजपने घातला आहे. महाराष्ट्रातील जनता आणि काँग्रेस कदापि हे सहन करणार नाही. छत्रपतींचे दोन राज्याभिषेक करण्यामागे शेतकऱ्याचा मुलगा राजा होतो, म्हणून त्याला मान्यता न देण्याचा षडयंत्र शतकानुसार शतके सुरू आहे. शिवछत्रपतींची बदनामी हा त्याचाच एक भाग आहे. प्रसाद लाड यांनी तर जन्मस्थानच बदलून हद्द केली. शिवरायांच्या जन्मतारखा दोन दोन करून विवाद निर्माण केला. त्यांनी स्वराज्य निर्माण केले, जे मूल्य दिले. ते मूल्य त्यांचे नव्हते असा काकतालिया योग तयार करण्याच्या षडयंत्र भाजपने केल्याचा आरोप लोंढे यांनी केला.
तोंड बंद करू - राज्यात अनेक मुद्दे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे. महिलांचा सन्मान आहे, याला बगल देण्यासाठी हे कट कारस्थान रचण्यासाठी भाजप छत्रपती शिवरायांचा वापर करत आहे , हे दुर्दैव आहे. ही विनाशकालीन विपरीत बुद्धी आहे. पण महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. लवकरच महाविकास आघाडी मोठा निर्णय घेऊन राज्यपालांपासून प्रसाद लाड यांच्यापर्यंतच्या लोकांची तोंड गप्प केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा लोंढे यांनी दिला. तसेच शिवरायांच्या सततच्या बदनामीचा जाब पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांना विचारल्याशिवाय राहणार नाही, असे ही लोंढे म्हणाले.
प्रसाद लाडची जीभ छाटली पाहिजे - रुपाली ठोंबरे पाटील
पुणे - भाजपाचे आमदार प्रसाद लाड ( BJP MLA Prasad Lad ) यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले होते. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर ( Controversial statement of BJP MLA Prasad Lad ) अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीने लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रवक्ते रुपाली ठोंबरे पाटील ( Rupali Thombre Patil ) हे आक्रमक झाले असून भाजप आमदार प्रसाद लाड यांची जीभ छाटली पाहिजे ( Prasad Lad tongue should be cut out ) अस मत यावेळी ठोंबरे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. तसेच शहराध्यक्ष प्रशांत जगताप ( City President Prashant Jagtap ) यांनी देखील यावेळी लाड यांनी केलेल्या विधानावर टीका केली आहे.
माझे मंत्रीपद गेले खड्ड्यात, शिवरायांबाबत वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही - गुलाबराव पाटील
जळगाव - भाजपचे प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला आहे असं अजब वक्तव्य केल्यानंतर त्यावर मंत्री गुलाबराव पाटील ( Minister Gulabrao Patil ) यांनी बोलताना म्हटले आहे की, छत्रपती शिवरायांच्या बाबतीत कुणाच्या मायच्या लालने बोलण्याची गरज नाही. तो कुठलाही पक्षाचा असो ज्यांना छत्रपती माहिती आहे, त्यांनी शिवरायांबद्दल बोलल पाहीजे. आज शिवरायांबद्दल बोलताना आचारसंहिता करण्याची गरज असून कोणीही उठ शिवरायांबद्दल बोलत आहेत. माझे मंत्रीपद खड्ड्यात गेले तरी चालेल मात्र, आम्ही त्यांना सोडणार नाही असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
छत्रपतींचा अवमान करणे भाजपचा अजेंडा - अंबादास दानवेंचे टीकास्त्र
मुंबई - भाजपमध्ये शिवछत्रपतींचा अवमान करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. वारंवार वक्तव्य करून छत्रपतींचा इतिहास पुसण्याचा घाट सुरू असल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोडले.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पाठोपाठ आमदार प्रसाद लाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य केले. प्रसाद लाड यांनी छत्रपतींचे जन्मस्थानच बदलून टाकले. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावरून भाजपला खडे बोल सुनावले.
इतिहासाचा अभ्यास भाजपने करावा - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान करण्याची स्पर्धा भाजपमध्ये लागली आहे. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे माहीत नाही, ते लोक नेतृत्व करायला लागले आहेत. महाराष्ट्रातील मातीच्या कणाकणाला माहित आहे की, छत्रपतींचा जन्म शिवनेरीवर झाला. भाजपने इतिहासाचा अभ्यास पूर्ण एकदा करण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला दानवे यांनी दिला.
छत्रपतींचा अवमान करणे भाजपचा अजेंडा - तसेच, वारंवार छत्रपतींचा अवमान करणे, भाजपचा हा अजेंडा आहे. तसेच वारंवार हल्ले करणे, महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवण्याची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवणे, भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून दिसून येते. यापूर्वी मंगल प्रभात लोढा यांनीही वक्तव्य केलं होते. आता प्रसाद लाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. महाराष्ट्रातील शिवछत्रपतींचा इतिहास पुसण्याची ही स्पर्धा आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे दानवे म्हणाले.