ETV Bharat / state

Rakhi Sawant Brother Arrested : राखी सावंतच्या भावाला ओशिवरा पोलिसांनी केली अटक, 22 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी - judicial custody till May 22

अभिनेत्री राखी सावंत अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडते. आता पोलिसांनी तिच्या सख्ख्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत. राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला चेक बाउंसप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने राकेश सावंतला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Rakesh Sawant
राकेश सावंत
author img

By

Published : May 9, 2023, 6:01 PM IST

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता राखी सावंतचा भाऊही चर्चेत आला आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात असलेल्या ओशिवरा पोलीस ठाण्यात चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेत्री राखी सावंत भाऊ राकेश सावंत याला अटक करण्यात आली आहे. हा खटला एका व्यावसायिकाने न्यायालयात दाखल केला होता.

22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली : 3 वर्षांपूर्वी राकेश सावंत याच्याविरोधात एका बिघा संरक्षणाबाबतचा चेक बाऊन्स झाल्याची तक्रार कोर्टात दाखल झाली होती. पैसे परत करण्याच्या अटीवर कोर्टाने राकेश सावंतला जामीन दिला. मात्र राकेशने पैसे परत केले नाहीत. त्यानंतर न्यायालयाने पुन्हा अटक वॉरंट जारी केला. यानंतर ओशिवरा पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने राकेशला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राकेशला चेक बाऊन्स प्रकरणी अटक केली : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री राखी सावंत हिच्या भावाला ओशिवरा पोलिसांनी चेक बाऊन्स प्रकरणी अटक केली आहे. तीन वर्षांपूर्वी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कोर्ट केस क्रमांक 96/ss/2021 कलम 138 अ जामीनपात्र वॉरंटवर राकेश अनंत सावंतला अटक करण्यात आलेली आहे. आता राखी सावंत यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वी देखील एका प्रकरणी राकेश सावंतला पोलिसांनी अटक केली होती. अभिनेत्री ऋतू खन्नाची छेड काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्ही दाखल करून अटक केली होती. याप्रकरणात सुटका झाल्यानंतर राकेशने स्वत:ला निर्दोष असल्याचा दावा केला होता.

  1. हेही वाचा : Shrikant Shinde on Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कंत्राटदाराची भाषा बोलणारे पुढारी; खासदार श्रीकांत शिंदेंची टीका
  2. हेही वाचा : Major Road Accident In MP : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये प्रवासी बस पुलाखाली कोसळल्याने भीषण अपघात, 15 प्रवाशांचा मृत्यू

3. हेही वाचा : Women babies die during pregnancy : दरवर्षी 4.5 दशलक्ष स्त्रिया, बाळांचा गरोदरपणात होतो मृत्यू...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.