ETV Bharat / state

‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार' असा संकल्प करा, शासनाला तुमच्या सहकार्याची गरज - राज्यातील कोरोनाची स्थिती

राज्यातील सर्व धर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासोबतच गुढी पाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’, असा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राजेश टोपे
राजेश टोपे
author img

By

Published : Mar 24, 2020, 6:55 PM IST

Updated : Mar 24, 2020, 7:12 PM IST

मुंबई - कोरोनाबाधित रुग्ण सध्या बरे होण्याच्या वाटेवर आहेत. या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्व धर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. यासोबतच गुढी पाडव्यानिमित्त नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’, असा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा - कोरोना निदान तपासणीचे भारतामध्ये पहिले किट तयार; पुण्यातील कंपनीला आले यश

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनता आणि माध्यम प्रतिनीधींशी संवाद साधला. आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले, राज्यात आतापर्यंत १०७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुमारे १५ रुग्ण बरे होण्याच्या वाटेवर आहेत. ही समाधानाची बाब आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन करूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत. ही गंभीर बाब आहे. राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या मुंबई, पुण्याहून मुळगावी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र, अशा लोकांना गावी प्रवेश दिला जात नाहीये. त्यांच्याकडे संशयाने न पाहता आपल्या परिजनांना गावी येऊ द्या, त्यांना अडवू नका, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. बाधीत रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी आपुलकीने राहा आणि माणुसकी सोडू नका, असा सल्लाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - COVID-19 LIVE : मुंबईत गेल्या २४ तासात ५ रुग्णांची नोंद, दिल्ली सरकार बांधकाम मजूरांना प्रत्येकी ५ हजार देणार

बुधवारी असलेल्या गुढी पाडव्याच्या सणानिमित्त जनतेला शुभेच्छा देतानाच नववर्षांची सुरूवात कोरोनाला दूर सारण्याच्या दृढ निश्चयाने करा. या विषाणूवर विजय मिळविण्याचा संकल्प करा. स्वयंशीस्त पाळून घरी थांबा, असेही त्यांनी सांगिले. राज्यात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासणी बंद ठेवली आहे. वास्तविक संचारबंदीतून वैद्यकीय सेवा वगळण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नये, असे आवाहनही टोपे यांनी यावेळी केले.

गर्दी रोखण्यासाठी राज्य शासनाला काही कठोर पावले उचलावी लागली आहेत. पण हे सारं राज्यातील सामान्य जनतेच्या हितासाठी केले जात आहे. या कठीण काळात शासनाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. सामान्यांनी हा विषय सहजपणे घेऊ नये, घरी थांबा असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

Last Updated : Mar 24, 2020, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.