मुंबई : आज साडेबारा नंतर भायखळा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस दिशेने जाणाऱ्या जलद आणि धीम्या सर्व लोकल एका मागोमाग उभ्या (Railway traffic in Mumbai disrupts commuters) राहिल्या. लोकल एका मागोमाग उभे राहिल्यामुळे मागील येणाऱ्या जलद एक्सप्रेस मेल आणि नवीन येणाऱ्या लोकल त्या देखील एका जागी उभ्या राहिल्या. यामुळे रेल्वे ट्राफिक निर्माण (Railway traffic in Mumbai) झाला.
प्रवाशांना अडथळा - प्रवाशांना कामावर जाण्यासाठी यामुळे मोठा अडथळा निर्माण (disrupts commuters) झाला. रेल्वे प्रवासी जतिन शहा यांनी सांगितले की, दहा मिनिटे झाले करिअरोड ते मज्जित बंदर या ठिकाणीच गाडी अडकलेली आहे. ही धीमी लोकल आहे. मात्र रेल्वेकडून कोणतेही अधिकृत सूचना नाही आम्ही व्यावसायिक माणस आहोत. आम्हाला वेळेवर जायला हवं. मात्र सर्व लोकल एका मागोमाग रांगेत उभे राहिल्याचं आधीच्या ट्रेनमधील आमच्या मित्राने सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.
तांत्रिक अडचण - यासंदर्भात मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी अनिल जैन आणि ए. के. सिंग यांना विचारले असता, त्यांनी खुलासा केला की - एका रेल्वे रुळावरून ट्रेन दुसऱ्या रेल्वे रुळावर ट्रॅक बदलते. त्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण होते. त्यामुळे हे झाले असल्याचे त्यांनी आपल्या खुलाशात नमूद केले. मात्र वारंवार होणाऱ्या अडथळ्यामुळे कायमस्वरूपी उपाय काय या संदर्भात मध्य रेल्वे महामंडळाकडून कोणताही ठोस खुलासा आला (Railway traffic Mumbai) नाही.