मुंबई - ब्रिटिश साम्राज्यापासून 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी देशभरात राष्ट्रध्वज फडकवला जातो. त्यात भारताची महत्वाची सैनिकी तुकडी असलेल्या टेरिटोरियल आर्मीने शिवडी स्थानकातील कर्मचाऱ्यांसोबत ध्वजारोहण केले .यावेळी शिवडी स्थानकातील सर्व रेल्वे कर्मचारी व 970 रेल्वे इंजिनिअर (टी ए) उपस्थित होते.
प्रादेशिक सेना ही भारतीय सेनेची स्वइच्छेनुसार सेवा करते. या आर्मीत दाखल होणारे स्वयंसेवक प्रतिवर्ष काही दिवसासाठी सैनिक प्रशिक्षण करण्यासाठी जातात. या आर्मीमध्ये रेल्वे सेवेतून ज्यांना इच्छा आहे ते कर्मचारी यात जोडले जातात. या आर्मीची गरज आवशयकता पड़ते तेव्हा देशाची रक्षा करण्यासाठी होते. अशी ही आर्मी आज मुंबईत आपले दैनंदिन काम करून शिवडी स्थानकात स्वइच्छेने आले व आपल्या कामाविषयी रेल्वे कर्मचाऱ्यांना जागृत करत देश सेवा हीच आपली सेवा म्हणत स्वतंत्र दिन साजरा केला.
यावेळी या आर्मीत असलेले संतोष शिंदे (मेल गार्ड), लोकेश कट्टी मणी(मेकॅनिक वर्कशॉप) आदी अधिकारी सैनिक होते. तसेच शिवडी स्थानकातील स्टेशन व्यवस्थापक विनायक शेवाळे तसेच सर्व कर्मचारी यांनी स्थानकात चिमुकल्या विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना रेल्वे स्थानकात बेवारस काही आढळल्यास पोलिसात तथा स्थानकात संपर्क करावा यासाठी जनजागृती केली.