ETV Bharat / state

नवीन वर्षात पुणे - मुंबई रेल्वे वाहतूक होणार सुरक्षित - Pune-Mumbai railway Transportation

लोणावळा कर्जत मार्गावरील मंकी हिल ते नागनाथ या 2 स्टेशनमधील दक्षिण घाट परिसरातील अप मार्गावर रेल्वे रूळ पावसात वाहून गेला होता. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून यामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मध्य रेल्वेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.

पुणे - मुंबई रेल्वे वाहतूक होणार सुरक्षीत
author img

By

Published : Nov 20, 2019, 1:36 AM IST

Updated : Nov 20, 2019, 8:31 PM IST

मुंबई - लोणावळा कर्जत मार्गावरील मंकी हिल ते नागनाथ या 2 स्टेशनमधील दक्षिण घाट परिसरातील अप मार्गावर रेल्वे रूळ पावसात वाहून गेला होता. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून यामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मध्य रेल्वेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. नवीन वर्षात 15 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.

नवीन वर्षात पुणे - मुंबई रेल्वे वाहतूक होणार सुरक्षीत

2 ऑक्टोबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात मंकी हिल ते नागनाथ या दोन स्टेशनच्या मधील दक्षिण घाट परिसरातील अप मार्गावरील रेल्वे रूळ 4 किमी खाली वाहून गेला. दोन टनेलच्या मध्ये एकीकडे टेकडी असलेला डोंगर भाग तर दुसरीकडे दरी या दोन्हीच्या मध्यभागी असलेला वाहून गेलेला रुळाचा भाग पुन्हा दुरुस्ती करणे रेल्वे प्रशासनासमोर मोठे आवाहन होते. त्यामुळे त्याच्या दुरुस्ती साठी रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच यामार्गावर मोठा ब्लॉक घेण्यात आला. तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, पनवेल पुणे पनवेल पॅसेंजर रद्द करण्यात आल्या. तर मुंबई कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई हैदराबाद, मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस, एलटीटी विशाखापट्टणम एल टी टी एक्सप्रेस, एलटीटी हुबळी, एलटीटी एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येत आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात नांदेड एक्सप्रेसच्या दर रविवारी फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा - बियाण्यावरील मक्तेदारी थांबवा..

10 कोटींचा खर्च
या कामासाठी 40 कामगार, 5 ते 6 सुपरवायझर व अधिकारी वर्ग, वैद्यकीय पथक हे युद्धपातळीवर 24 तास काम करत आहेत. मालगाडीच्या माध्यमातून तुकड्या तुकड्यांमध्ये सामानाची ने आण होतेय. या रुळाच्या कामाच्या ठिकाणी 25 मीटर आत भिंत बांधण्यात आली असून सिमेंटचे काम करून 400 मायक्रो पायलिंग लावण्यात आले आहेत. आतापर्यंत 60 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. आता येत्या काही दिवसांत गर्डर टाकण्याचा काम हाती घेतले जाणार आहे. या संपूर्ण कामासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येणार आहे.

सुरक्षेसाठी उपाययोजना
या कामाच्या जागेवर 19 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, गार्ड आणि मोटर्मनसाठी टेलीकम्युनिकेशन लिकी केबल,टनेल पोर्ट स्टील बसविण्यात आलेत.

घाट विभागात हिल गँग महत्वाची
पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. घाटविभाग दरड कोसळू नयेत,यासाठी मध्य रेल्वेकडून मान्सून पूर्व नियोजन करण्यात येते. यात महत्वाची भूमिका बजावते ती म्हणजे मध्य रेल्वेची हिल गँग. ही हिल गँगचे रेल्वे कर्मचारी टेकडीवर रोपच्या सहाय्याने जातात आणि कोसळणाऱ्या दरडींचा आढावा घेऊन त्यावर मार्क करुन त्या दरडी ब्लॉक कालावधीत पाडल्या जातात. तर गेल्या 2 वर्षांपासून येथे ड्रोनच्या साहाय्याने धोकादायक दरडींचे निरीक्षण देखील करण्यात येतेय.

हेही वाचा - दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक, येत्या दोन दिवसात पेच सुटण्याची शक्यता

Intro:मुंबई - लोणावळा कर्जत मार्गावरील मंकी हिल ते नागनाथ या दोन स्टेशनच्या मधील दक्षिण घाट परिसरातील अप मार्गावर रेल्वे रूळ पावसात वाहून गेल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून यामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झालीय. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मध्य रेल्वेने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. नवीन वर्षात 15 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी बोर घाट येथे पाहणी दौऱ्या दरम्यान दिली.
Body:2 ऑक्टोबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसात मंकी हिल ते नागनाथ या दोन स्टेशनच्या मधील दक्षिण घाट परिसरातील अप मार्गावरील रेल्वे रूळ 4 किमी खाली वाहून गेला. दोन टनेलच्या मध्ये एकीकडे टेकडी असलेला डोंगर भाग तर दुसरीकडे दरी या दोन्हीच्या मध्यभागी असलेला वाहून गेलेला रुळाचा भाग पुन्हा दुरुस्ती करणे रेल्वे प्रशासनासमोर मोठे आवाहन होते. त्यामुळे त्याच्या दुरुस्ती साठी रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच यामार्गावर मोठा ब्लॉक घेण्यात आला. तर मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, पनवेल पुणे पनवेल पॅसेंजर रद्द करण्यात आल्या. तर मुंबई कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई हैदराबाद मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस, एलटीटी विशाखापट्टणम एल टी टी एक्सप्रेस, एलटीटी हुबळी एलटीटी एक्सप्रेस पुणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येत आहेत.
येत्या डिसेंबर महिन्यात नांदेड एक्सप्रेसच्या दर रविवारी फेऱ्या सुरू करण्यात येणार आहे.

10 कोटींचा खर्च
या कामासाठी 40 कामगार, 5 ते 6 सुपरवायझर व अधिकारी वर्ग, वैद्यकीय पथक हे युद्धपातळीवर 24 तास काम करत आहेत. मालगाडीच्या माध्यमातून तुकड्या तुकड्यांमध्ये सामानाची ने आण होतेय. या रुळाच्या कामाच्या ठिकाणी 25 मीटर आत भिंत बांधण्यात आली असून सिमेंटचे काम करून 400 मायक्रो पायलिंग लावण्यात आले आहेत.आतापर्यंत 60 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. आता येत्या काही दिवसांत गर्डर टाकण्याचा काम हाती घेतले जाणार आहे. या संपूर्ण कामासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च येणार आहे.

सुरक्षेसाठी उपाययोजना
या कामाच्या जागेवर 19 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, गार्ड आणि मोटर्मनसाठी टेलीकम्युनिकेशन लिकी केबल,टनेल पोर्ट स्टील बसविण्यात आलेत.

घाट विभागात हिल गँग महत्वाची
पावसाळ्यात पावसामुळे दरळ कोसळण्याच्या घटना समोर येतात. घाटविभाग दरळ कोसळू नयेत,यासाठी मध्य रेल्वेकडून मान्सून पूर्व नियोजन करण्यात येत. यात महत्वाची भूमिका बजावते ती म्हणजे मध्य रेल्वेची हिल गँग. ही हिल गँगचे रेल्वे कर्मचारी टेकडीवर रोपच्या सहाय्याने जातात आणि कोसळणाऱ्या दरडींचा आढावा घेऊन त्यावर मार्क करुन त्या दरडी ब्लॉक कालावधीत पाडल्या जातात. तर गेल्या 2 वर्षांपासून येथे ड्रोनच्या साहाय्याने धोकादायक दरडींचे निरीक्षण देखील करण्यात येतेय.Conclusion:
Last Updated : Nov 20, 2019, 8:31 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.