ETV Bharat / state

Protests By Journalists In Mumbai : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येप्रकरणी पत्रकारांची मुंबईत निदर्शने - Refinery

कोकणातील रिफायनरीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे क्रूरपणे हत्या करण्यात आली या हत्याचा निषेधार्थ मुंबईतील विविध पत्रकार संघटनांनी आज मंत्रालया जवळील गांधी पुतळ्याजवळ निदर्शन केली तसेच वारीशे यांच्या खूना प्रकरणी आंबेरकर यांच्यावर मोक्का लावण्याची मागणी केली.

Protests By Journalists In Mumbai
पत्रकारांची मुंबईत निदर्शने
author img

By

Published : Feb 10, 2023, 7:28 PM IST

पत्रकारांची मुंबईत निदर्शने

मुंबई : पत्रकार शशिकांत वारीशे यांची राजापूर येथे जीप खाली चिरडून हत्या करण्यात आली. राजापूर परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरीच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ आणि नागरीक यांच्या बाजूने पत्रकार म्हणून वारीशे यांनी सातत्याने लेखन केले त्यांच्या लेखनाने चिडून जाऊन स्थानिक गुंड असलेल्या रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांनी याने वारीचे यांच्या मोटरसायकलला मागून धडक देत त्यांच्या अंगावर गाडी घातली यामध्ये चिरडून जाऊन वारीशे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिकांच्या आणि पत्रकारांच्या आंदोलनानंतर आंबेरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकार संघटनांचे मुंबईतील निदर्शन : वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी आज विविध पत्रकार संघटनांच्या वतीने मुंबईतील मंत्रालयाजवळ काळ्याफिती लावून निदर्शने करण्यात आली. तसेच मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे संजय परब यांनी पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली. तसेच पीडित वारीशे कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची तातडीची मदत सरकारने द्यावी अशी मागणी केली. गुंड आंबेरकर याच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करावी. यापुढे सर्व पत्रकारांना संरक्षण मिळावे यासाठी सरकारने लक्ष घालावे अशी मागणी या निमित्ताने करण्यात आली.

आंबेरकर यांनी यापूर्वीही हल्ला केला : या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यांनी यापूर्वीही दहशत माजवण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे. रिफायनरी विरोधक समितीचे सरचिटणीस नरेंद्र जोशी यांनाही न्यायालयाच्या आवारात गुंडांकरवी दगड मारून हल्ला करण्याचा प्रयत्न आंबेडकर यांनी केला होता असा आरोप जोशी यांनी केला आहे. त्यामुळे अशा स्थानिक गुंडांना शासनाने कठोर कारवाई करत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करावेत. तसेच स्थानिक नागरिक, पत्रकारांना संरक्षण द्यावे, भयमुक्त वातावरण निर्माण करावे अशी मागणी ही यावेळी नरेंद्र जोशी यांनी केली.

सर्व पत्रकार संघटनांची उपस्थिती : गांधी पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनाला मुंबईतील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ, प्रेस क्लब, मराठी पत्रकार परिषद तसेच अन्य संघटनांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला.

हेही वाचा - PM Flag Off Vande Bharat Train Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.