ETV Bharat / state

Christmas At Victoria Church : मुंबईत ११४ वर्ष जुन्या चर्चमध्ये नाताळ साजरा करण्यासाठी जय्यत तयारी ; विशेष सेल्फी पॉईंट आणि स्नो मॅन - नाताळाची जोरदार तयारी

नाताळ सणाचा उत्साह संपूर्ण देशासह मुंबईतही पाहायला मिळत (Christmas At Victoria Church) आहे. मुंबईतील सर्वात जुन्या विक्टोरिया चर्चमध्ये नाताळ साजरा करण्याची तयारी सुरू (Preparations to celebrate Christmas) आहे. चर्चमध्ये पहिल्यांदाच सेल्फी पॉईंट देखील व्हिक्टोरिया चर्चने तयार केला आहे. या सजावटीत स्नो मॅन देखील मुंबईकरांना पाहायला मिळणार आहे. सर्व धर्मीयांनी चर्चमध्ये येऊन नाताळ सण साजरा करावा, असे आवाहन चर्च प्रशासनाकडून करण्यात आलेले (Victoria Church in Mumbai) आहे.

celebrate Christmas
मुंबईत चर्चमध्ये नाताळ साजरा करण्यासाठी जय्यत तयारी
author img

By

Published : Dec 24, 2022, 11:40 AM IST

मुंबईत चर्चमध्ये नाताळ साजरा करण्यासाठी जय्यत तयारी

मुंबई : मुंबईत सध्या सर्वत्र नाताळ साजरा करण्याची तयारी सुरू (Preparations to celebrate Christmas) आहे. मुंबईत शंभर वर्षापेक्षाही जुनी काही चर्च आहेत. सर्वात जुने असलेले माहीम येथील विक्टोरिया चर्चमध्ये देखील दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त नाताळ साजरा करण्याची तयारी पाहायला मिळत (Christmas At Victoria Church) आहे.

नाताळाची जोरदार तयारी : नाताळ सणाचा उत्साह संपूर्ण देशासह मुंबईतही पाहायला मिळत आहे. नाताळ साजरा करण्यासाठी मुंबईच्या बाजारपेठा देखील सजल्या आहेत. तर तिथेच मुंबईमध्ये असलेल्या सर्व चर्चमध्ये नाताळ साजरा करण्याची लगबग सुरू आहे. मुंबईत 100 वर्षापेक्षा जुनी पाच ते सहा चर्च आहेत. यामध्ये देखील नाताळ उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. यामध्ये सर्वात जुने असलेल्या मुंबईतल्या चर्चपैकी एक म्हणजे माहीम येथील विक्टोरिया चर्च होय. विक्टोरिया चर्च 1906 साली तयार करण्यात आले होते. आता या वर्षाला जवळपास 114 वर्ष झाली आहेत. विक्टोरिया चर्चमध्ये देखील नाताळाची जोरदार तयारी पाहायला (Victoria Church in Mumbai) मिळते.

नाताळासाठी विशेष सजावट : विक्टोरिया चर्च मुंबईतील सर्वात जुन्या चर्चपैकी एक असल्याने संपूर्ण मुंबईभरातून शेकडो ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये नाताळ सण साजरा करण्यासाठी येत असतात. गेली दोन वर्ष कोरानाच्या सावटामुळे नाताळ सण साजरा करता आला (Victoria Church) नव्हता. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त सण साजरे केले जात आहेत. त्यामुळे यावर्षी विक्टोरिया चर्चमध्ये देखील मोठ्या उत्साहात नाताळ सणाची तयारी करण्यात आली आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माची कहाणी दृश्याच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. चर्चच्या सभोवताली विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यासोबतच नाताळ सणाला चर्चमध्ये पहिल्यांदाच मुंबईमध्ये सेल्फी पॉईंट देखील व्हिक्टोरिया चर्चने तयार केला असून सजावट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेता येणार आहे. या सजावटीत स्नो मॅन देखील मुंबईकरांना पाहायला मिळणार (celebrate Christmas) आहे.

सर्वधर्मियांना येण्याचे आवाहन : करोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच निर्बंध मुक्त सण साजरे केले जात आहेत. मुंबई अनेक धर्माचे लोक राहतात. ते सर्व प्रत्येक सण साजरे करतात. 25 डिसेंबरला होणाऱ्या नाताळ सणाला प्रत्येक सर्व धर्मीयांनी चर्चमध्ये येऊन नाताळ सण साजरा करावा, असे आवाहन चर्चचे कोंसिल मेंबर अग्नोलो फर्नांडिस यांनी केले आहे. तसेच सध्या कोरोना येण्याची पुन्हा धास्ती लागली असल्याने त्याबाबत देखील चर्च पूर्ण काळजी घेत असल्याचे त्यांनी (Preparations For Christmas) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.