मुंबई - जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचा अनुभव घेतल्यानंतर आता पुन्हा फेब्रुवारीमध्येही हाच अनुभव घ्यायला लागेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार १६ ते १८ फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी अवकाळी पाऊस होऊ शकतो. उद्या(मंगळवार) पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागात वादळी पावसाचा अंदाज आहे.
१७ तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे. उत्तर भारतातून वाहणारे थंड वार्याचे प्रवाह थांबले आहेत. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात उष्ण वारे वाहत आहेत. परिणामी आता राज्यातील अनेक शहरांच्या तापमानामध्ये वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आज(सोमवार) सकाळचे तापमान 20 अंश सेल्सिअस आहे तर पुण्याचे तापमान 14 अंश सेल्सिअस आहे.
पुढील काही दिवस प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या परिसरात वीजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकर्यांनी या पावसाच्या अंदाजानुसार त्यांच्या कामांचे नियोजन करावे, असेही हवामान विभागाने सांगितले आहे. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईचे तापमान सरासरी पेक्षा जास्त आहे. रत्नागिरी आणि अलिबागमध्ये मात्र, तापमानाचा पारा सरासरी पेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता - महाराष्ट्र अवकाळी पाऊस अपडेट
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.