मुंबई : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण ( Sexual abuse of a minor girl ) केल्याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू असलेल्या आरोपी विद्यामणी विश्वकर्मा याचे मृत्यू प्रमाणपत्र ( POSCO accused submits fake death certificate ) त्याच्या भावाने विशेष कोर्टात सादर केले. परंतु वरळी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल नितेश तळेकर यांच्या सतर्कतेमुळे ( police vigilance exposes fraud ) ते मृत्यू प्रमाणपत्र बनावट ( Fake death certificate ) असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या आरोपीला पुन्हा अटक होऊन सात वर्षाचा कारावास भोगावा लागला.
लैंगिक शोषण - जवळपास चार वर्षांपूर्वी विश्वकर्मा ने त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या तीन वर्षाच्या चिमुकलीला ती खेळत असताना स्वतःच्या घरी नेले. नंतर तिचे लैंगिक शोषण ( Sexual abuse of a minor girl ) केले. याप्रकरणी विश्वकर्मावर पोस्को ( POCSO ) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. हा खटला विशेष न्यायालयात सुरू असताना तो जामीनावर बाहेर आला होता. अचानक त्याचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र त्याच्या भावाने 2018 मध्ये न्यायालयात सादर केले. परंतु कोर्टरूममध्ये उपस्थित असलेले वरळी पोलीस ठाण्याचे हेड पोलीस कॉन्स्टेबल तळेकर यांनी त्या मृत्यू प्रमाणपत्राची सखोल तपासणी केली असता ते बनावट असल्याचे आढळून आले.
मृत्यू प्रमाणपत्राची तपासणी - त्यावेळी त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही विश्वकर्माला परत आणू त्याचे मृत्यू प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय व्यक्त करत पडताळणीसाठी त्यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. त्यानुसार न्यायालयाने हेड कॉन्स्टेबल तळेकर यांच्या मागणीला परवानगी दिली. त्यानंतर पुढचे तीन महिने मृत असलेला बनाव केलेल्या विश्वकर्माचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मृत्यू प्रमाणपत्राची तपासणी करताना त्यावर सर्व सह्या, सरकारी शिक्के होते. मात्र, सर्व शिक्के एकाच ठिकाणी बनवल्यासारखे पोलिसांना आढळले वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांच्या अधिकृत सीलच्या तसेच त्यांचे आकार आणि कागदपत्रे एक समानच आढळून आली होती. त्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला.
आरोपीला पुन्हा अटक - पोलीस ठाण्यातील हवालदार ताज लोणारे हे एका स्वतंत्र पंच साथीदारासह आरोपीच्या पत्त्यावर गेले. तळेकर सरपंचांना भेटले. चौकशीत प्रमाणपत्र दिले नसल्याचे सरपंचांनी त्यांना सांगितले. आरोपीच्या घरी मृत दाखवलेल्या आरोपीची पत्नी मुले, भाऊ त्या ठिकाणी राहत होते. सुरुवातीला विश्वकर्माचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर विश्वकर्मा दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी गेल्याचे सांगितले. विश्वकर्मासोबत फोनवर बोलल्यावर प्रमाणपत्र बनावट असल्याची तळेकर यांची खात्री झाली. त्यानंतर आरोपीला मुंबईत आणण्यात आले. दरम्यान आरोपी विश्वकर्माला न्यायालयात हजर करून पुन्हा अटक करण्यात आली.