मुंबई : पोलीस भरतीच्या प्रत्यक्षात मैदानी चाचणीला आजपासून सुरूवात होणार (police recruitment in Maharashtra) आहे. त्यासाठी पोलीस दलाकडून पूर्ण तयारी करण्यात आली आहे. 2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. रविवार वगळून ही चाचणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले (Physical Efficiency Test for police recruitment) आहे.
चाचणीसाठी तयारी पूर्ण : गेल्या चार ते पाच वर्षानंतरची एवढ्या मोठ्या प्रमाणातील ही पहिलीच भरती असल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी केली आहे. अनेक ठिकाणी सरावांनी मैदाने गजबजली आहे. यवतमाळ जिल्हा पोलीसांकडून मैदानी चाचणीसाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. पोलीस कवायत मैदानावर (हेलीपॅड) होणार्या चाचणीसाठी पहाटे पाच वाजता उमेदवारांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. एका दिवशी एक हजार उमेदवारांना चाचणीसाठी बोलविण्यात आले (Physical Efficiency Test starts) आहे.
असे आहे नियोजन : हेलीपॅड मैदानावर पोलीस कवायत मैदान तयारी करण्यात आली आहे. कागदपत्रांची तपासणी, छाती, उंचीची मोजणी, गोळा फेक व 100 मीटर धावणे हे येथील मैदानात होणार आहे. यात मुलींसाठी 800 मीटर व मुलांसाठी 1600 मीटर धावण्याची स्पर्धा होणार आहे. यवतमाळ जिल्हा पोलीस त्यांच्या भरती प्रक्रियेच्या शारीरिक चाचण्यांमध्ये प्रथमच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) टॅग वापरत आहे. जेणेकरून उमेदवारांनी अनिवार्य 800 आणि 1600 मीटर धावणे पूर्ण करण्यासाठी घेतलेला वेळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रेकॉर्ड केला (Physical Efficiency Test) जाईल.
मैदानी चाचणीवर सीसीटीव्हीची नजर : 2 आणि 3 जानेवारीला पोलीस चालक पदाच्या 58 जागेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची चाचणी घेण्यात येणार आहे. यानंतर पोलीस शिपाई पदाच्या 244 जागेसाठी मैदानी चाचणी पार पडणार आहे. पहाटे पाच ते सकाळी 11 वाजेपर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण मैदानी चाचणीवर सीसीटीव्हीची नजर असणार आहे. मैदानी चाचणीच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जाणार (police recruitment starts) आहे.
मैदानी चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे : मैदानी चाचणीला येताना उमेदवारांनी कोणती कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, याबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती, आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती, सर्व मूळ कागदपत्रे, सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच, अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो), आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र ही कागदपत्रे सोबत आवश्यक (police recruitment) आहेत.