ETV Bharat / state

Police Performed Last Rites On Body : गिरगाव चौपाटीवर सापडलेल्या अल्पवयीन मुलाच्या मृतदेहावर पोलिसांनी केले अंत्यविधी

author img

By

Published : Nov 1, 2022, 4:17 PM IST

बाल सुधार गृहात हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचा (Police Performed Last Rites On Body) अंत्यविधी, मुंबई पोलिसांनी सोमवारी पार पाडला. निषाद हा गिरगाव चौपाटीवर (minor boy found Girgaon Chowpatty) एकटाच फिरतांना डी बी मार्ग पोलिसांना 6 ऑगस्ट रोजी सापडला होता.

Police Performed Last Rites On Body
मृतदेहावर पोलिसांनी केले अंत्यविधी

मुंबई : बाल सुधार गृहात हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचा (Police Performed Last Rites On Body) अंत्यविधी मुंबई पोलिसांनी सोमवारी पार पाडला. गेल्या दोन महिन्यांपासून शिवाजी पार्क पोलीस या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेत होते. मात्र, नातेवाईकांचा शोध काही लागला नाही. शोध घेण्यासाठी शिवाजी पार्क पोलीसांनी दिल्ली, उत्तर प्रदेश, सह विविध ठिकाणी जाऊन आल्याची माहिती पोलिसांनी दिली. minor boy found Girgaon Chowpatty. पोलिसांना हसवान निषाद हा मुलगा गिरगाव चौपाटीवर सापडला होता. त्याला ऑगस्टमध्ये माटुंगा येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते.

हा मुलगा मानसिक दृष्ट्या अस्थिर होता, तो नीट बोलू शकत नव्हता. चार अल्पवयीन मुलांसह सहा जणांनी त्याची नुकतीच बालसुधारगृहात हत्या केली होती. त्यानंतर त्या सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. निशांत जिवंत असताना त्याने केवळ तीन शब्दांत पत्ता सांगितला होता. त्यात पारस शाळा बस्तीपाडा स्टार चौक या शब्दांचा समावेश होता. त्यानंतर त्याच्या पालकांची ओळख पटवण्यासाठी आणि शोध घेण्यासाठी पोलीस अनेक राज्यांमध्ये गेले होते. तरी देखील कुटुंबीयांचा थांब पत्ता न लागल्याने अखेर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून; सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेण्यात आली आणि सोमवारी सायन येथे निषादवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

निषाद हा गिरगाव चौपाटीवर एकटाच फिरतांना डी बी मार्ग पोलिसांना 6 ऑगस्ट रोजी सापडला होता. त्यानंतर त्याला बालकल्याण समिती समोर हजर करण्यात आले. बालकल्याण समितीने त्याला बाल सुधार गृहात दाखल केले. त्यानंतर त्याला माटुंगा येथील बाल सुधार गृहात दाखल करण्यात आले. निषाद हा बोलू शकत नसल्यामुळे, तो कुणाशी जास्त बोलत नव्हता. मात्र अलीकडेच एक दिवस रात्री दहा वाजण्याच्या सुमारास निषाद माटुंगा येथील डेव्हिड ससून बालसुधारगृहात बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.