मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अडीच हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात अटक करण्यात तिन्ही आरोपींना 23 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सारंग वाधवान, राकेश वाधवान व वरीयाम सिंग या तिघांना आज मुंबईतील दिवानी न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. त्यावेळी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.
सुनावणीच्या वेळेस न्यायालयाबाहेर पीएमसी बँक खातेदारांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. तर शासनाने बँकेबाबत योग्य ती खबरदारी घेत बँक खातेदारांच्या ठेवीबद्दल त्यांना आश्वस्त करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
हेही वाचा - मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये महायुतीची ताकद, विठ्ठल लोकरेंना रिपब्लिकन जनशक्तीचा पाठिंबा
दरम्यान, पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यामुळे त्यांचा जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तिन्ही आरोपींना 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा - विधानसभा २०१९ : आज अकोला, परतूर, पनवेलमध्ये पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभा