ETV Bharat / state

इंधनाच्या किमती वाढता वाढता वाढे... - mumbai diesel price today

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. पेट्रोलचे दर मुंबईत १०० रुपये ७६ पैसे झाले असून डिझेलचे दर ९२ रुपये ७३ पैसे झाले आहेत.

इंधनाच्या किमती वाढता वाढता वाढे...
इंधनाच्या किमती वाढता वाढता वाढे...
author img

By

Published : Jun 1, 2021, 4:23 PM IST

मुंबई - मुंबईत इंधनाच्या किमतीचा भडका कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. गेल्या शनिवारीच पेट्रोलने शंभरी पार केली होती आणि आता सलग चौथ्या दिवशी पेट्रोल शंभरपार विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०० रुपये ७६ पैसे, तर डिझेल ९२ रुपये ७२ पैसे झाले आहे. पेट्रोलच्या दरात लिटरमागे २५ पैसे, तर डिझेल दरात २३ पैसै वाढ करण्यात आल्याचे सरकारी इंधन कंपन्यांनी जाहीर केले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात परभणीतील पेट्रोलचे दर आधीच शंभरीपार गेले होते. आता देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलदर शंभरीपार गेले आहेत. पेट्रोलचे दर मुंबईत १०० रुपये ७६ पैसे झाले असून डिझेलचे दर ९२ रुपये ७३ पैसे झाले आहेत.

देशात पेट्रोल -डिझेलच्या किंमतीचा उच्चांक गाठला
वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचा भाव हा 90 रुपयांवर पोहोचला आहे. देशात पेट्रोल -डिझेलच्या किंमतीचा उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात आतापर्यंत एकूण 16 दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे 4 मे पासून इंधनाच्या दरात वाढ सुरु झाली. मे महिन्यात पेट्रोलचा दर हा 3.59 रुपये प्रतिलीटरने तर डिझेलचा दर हा 4.13 रुपये प्रतिलीटरने वाढला आहे.

दररोज पेट्रोल-डिझेल किंमती अपडेट केल्या जातात
दररोज पेट्रोल-डिझेल किंमती अपडेट केल्या जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडच्या किंमतीच्या आधारे परदेशी विनिमय दरासह पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज अपडेट केल्या जातात. तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अद्ययावत करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.