ETV Bharat / state

Mangal Prabhat Lodha News: मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात न्यायालयात याचिका; 200 कोटी रुपये फसवणुकीबाबत सीबीआय चौकशीची मागणी - Petition against Minister Mangal Prabhat Lodha

बांधकाम क्षेत्रामधील वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या एका कंपनीने महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची सीबीआयने चौकशी करावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. दोनशे कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप लावला आहे. याबाबत सीबीआयने चौकशी करावी, अशी कंपनीने मागणी केली आहे.

Mangal Prabhat Lodha News
मंत्री मंगल प्रभात लोढा
author img

By

Published : May 10, 2023, 10:39 AM IST

मुंबई : मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अडचणींत वाढ होईल, असे चिन्ह दिसत आहे. रियल्टर्स नेटवर्क या बांधकाम क्षेत्रातील कंपनीची मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगल प्रभात लोढा राज्याचे मंत्री असल्यामुळे राज्याचा गृह विभाग निष्पक्ष तपास करू शकत नाही. यामुळे ही चौकशी सीबीआयकडून केली जावी, अशी मागणी याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडे करण्यात आलेली आहे.

बांधकाम क्षेत्रातील सल्लागार : रियल्टर्स नेटवर्क ही राज्यातील बांधकाम क्षेत्रातील सल्लागार म्हणून काम करीत आहे. गेल्या वीस वर्षापासून बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव आहे. बांधकाम प्रकल्पांना विविध प्रकारे सल्ला देणे, हे त्यांचे काम आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मंत्रिमंडल प्रभात लोढा यांच्यावर 200 कोटी रुपये फसवणुकीबाबत केंद्रीय अन्वेषण ब्युरो यांनी त्याबाबत चौकशी करावी, अशी मागणी एका याचिकेद्वारे केली आहे. आमची कंपनी ही बांधकाम क्षेत्रामध्ये अधिकृत आणि नोंदणीकृत कंपनी आहे. याबाबतची नोंदणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत अनेक विकासकांकडे त्याची नोंद आहे.असा दावा त्यांनी याचिकेमध्ये केलेला आहे. तसेच 2013 मध्ये आम्ही मंगल प्रभात लोढा यांच्या संदर्भातली तक्रार दाखल केली होती. ही देखील बाब याचीकेमध्ये अधोरेखित करण्यात आलेली आहे.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोद्वारे चौकशी : ही तक्रार मुंबई न्यायदंडाधिकारी यांच्याकडे केल्यामुळे त्यांनी मग एनएम मार्ग पोलीस स्टेशन मुंबई यांना तक्रार नोंदवण्याचे आदेश देखील दिले होते. तसेच त्याबाबत तपास देखील करावा, असे देखील त्या आदेशामध्ये नमूद होते. मात्र एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशन हे राज्याच्या गृह विभागाच्या अंतर्गत येते. त्याच्यामुळे तेथे 'मंगल प्रभात लोढा मंत्री'असल्यामुळे निष्पक्ष तपास होणार नाही. म्हणून मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करत केंद्रीय अन्वेषण ब्युरो यांच्याद्वारे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी देखील याचीकेमध्ये करण्यात आलेली आहे. याचिकेत ही देखील बाब मांडण्यात आलेली आहे की,जेव्हा याबाबत तक्रार केली. तेव्हा लोढा समूहाच्या प्रवर्तकांकडून आम्हाला धमक्या देखील दिल्या गेलेल्या आहेत. परिणामी मंगल प्रभात लोढा मंत्री असल्यामुळे केंद्रीय गुन्हे अन्वेषण ब्युरो यांच्याकडून या 200 कोटी रुपये फसवणुकीची चौकशी करण्यात यावी.

  1. हेही वाचा : Interfaith Committee: आंतरजातीय नव्हे तर आता आंतर धर्मीय समिती, सरकारने त्या समितीच्या नावात केला बदल
  2. हेही वाचा : Mumbai News: बेस्ट धक्काबुक्की प्रकरणी अखेर राहुल नार्वेकर मंगल प्रभात लोढा यांची न्यायालयात हजेरी
  3. हेही वाचा : Mangal Prabhat Lodha : मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजस्थानात घेतली मृतक कन्हैयालालच्या कुटुंबियांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.