ETV Bharat / state

हैदराबाद येथील डॉ. तरुणी अत्याचार प्रकरण; महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात घटनेचा तीव्र निषेध - Latur

हैदराबाद येथे डॉ. तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा देशभरातून निषेध होत असून पीडितेला श्रद्धांजली वाहिली जात आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातही नागरिकांकडून या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात असून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

mumbai
हैदराबाद येथील तरुणी अत्याचार प्रकरणी विरोध करताना विविध शहरातील नागरिक
author img

By

Published : Dec 2, 2019, 9:10 PM IST

Updated : Dec 2, 2019, 11:10 PM IST

मुंबई- हैदराबाद येथे डॉ. तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेचा देशभरातून निषेध होत असून पीडितेला श्रद्धांजली वाहिली जात आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील नागरिकांकडून या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात असून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

निषेध करताना व पीडितेला श्रद्धांजली वाहताना राज्यातील नागरिक

हैदराबाद येथील अत्याचाराच्या घटनेविरोधात लातुरात निषेध मोर्चा काढण्यात आला. रविवारी शिवाजी मोटेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायक परिसरात कँडल मार्च काढण्यात आला होता. यावेळी हजारो विद्यार्थी उपस्थित होते. निषेध नोंदविण्यासाठी गणेश मंदिर परिसरात मेणबत्त्या पेटविण्यात आल्या होत्या. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी या मागणीचे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते. मुलींमधील एकी हाच संदेश समाजात जावा जेणेकरून अशाप्रकारचे धाडस पुन्हा होणार नाही म्हणूनच हा कँडल मार्च काढण्यात आला होता.

सोलापुरात डॉक्टरांनी केला घटनेचा निषेध

लातूरप्रमाणे सोलापुरातही या घटनेचा निषेध करण्यात आला. शहरातील डॉ. सुनील गायकवाड यांनी पीडित तरुणीचे चित्र असलेले बॅनर घालून चौका-चौकात जाऊन निषेध केला. स्त्रीयांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला.

बीडमध्ये विविध संघटनांकडून मूक मोर्चा

हैदराबाद येथील डॉ. तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. या मुख्य मागणीसाठी बीडमध्ये विविध विद्यार्थी संघटनांनी व काही वकिलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.

हैदराबाद येथील घटना निंदनीय - नवनीत राणा

हैदराबाद येथे घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. भारतमाता असा उल्लेख आम्ही आपल्या देशाचा करतो. असे असताना भारतात माता, बहिणी सुरक्षित नाही. हे दुर्दैव असून आपल्या सरकारने बलात्कार करणाऱ्यांना फासवरच लटकवायला हवे, असे खासदर नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

आपल्या देशात वयस्क आणि अल्पवयीन, अशी कारणे समोर करून आरोपींना वाचविण्यात येते. ज्यांना बलात्कार करता येतो अशांचे वय न पाहता त्यांना फासावरच लटकविण्याचा कायदा हवा. सभागृहात मी हा विषय मांडणार असून बलात्कार करणाऱ्यांना फाशीच देण्यात यावी, असे खासदार नवनीत राणा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

वर्धेत महिला काँग्रेसकडून विरोध प्रदर्शन

हैदराबाद येथील डॉ. तरुणी अत्याचारप्रकरणी वर्धेतील महिला काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'पुन्हा निर्भया' असे लिहिलेले फलक हातात घेत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. सोबतच प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा- 'आरे'तील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे; साजरा केला आनंद

Intro:बाईट : प्रा. शिवाजी मोटेगावकर, लातूर

'त्या' घटनेच्या निषेधार्थ लातुरातील तरुणी रस्त्यावर
लातूर : हैद्राबाद येथील डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली आहे. संपूर्ण देशभर या घटनेचा निषेध होत असून रविवारी रात्री लातुरातील तरुणींनी अष्टविनायक परिसरात कँडल मार्च काढून निषेध व्यक्त केला.
Body:हैद्राबाद येथे 27 नव्हेंबर रोजी मदत करण्याचा बहाणा करून एका ट्रक चालकासह इतर तिघांनी अत्याचार करून निघृन हत्या केली होती. 28 नोव्हेंबर रोजी हा सर्व प्रकार उघडकीस आला असून त्या घटनेतील चारही आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता देशभर निदर्शने केली जात आहेत. रविवारी शिवाजी मोटेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायक परिसरात कँडल मार्च काढण्यात आला होता. यावेळी हजारो विद्यार्थी उपस्थित होते. निषेध नोंदविण्यासाठी गणेश मंदिर परिसरात मेणबत्या पेटविण्यात आल्या होत्या. यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी या मागणीचे फलक विद्यार्थ्यांच्या हाती होते. मुलींमधील एकी हाच संदेश समाजात जावा जेणेकरून आशा प्रकारचे धाडस पुन्हा होणार नाही म्हणूनच हा कँडल मार्च काढण्यात आला होता. Conclusion:मंगळवारी लातूरकर च्या वतीने पुन्हा निषेध नोंदवला जाणार आहे.
Last Updated : Dec 2, 2019, 11:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.