ETV Bharat / state

Nair Hospital : नायर रुग्णालयातील रुग्णाला स्टार्टअप अंतर्गत बनवण्यात आलेले कृत्रिम हात प्रदान - बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड

राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्माईल कौन्सिल या बिजनेस सेंटर अंतर्गत बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड या नवउद्यमी संस्थेने तयार केलेले प्रगत कृत्रिम हात मुंबई सेंट्रल स्थित महानगरपालिकेच्या बाई य. ल. नायर धर्मादाय रूग्णालयातील गरजू रूग्णास सह आयुक्त अजित कुंभार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Advanced Artificial Hand
स्टार्टअप अंतर्गत बनवण्यात आलेला कृत्रिम हात
author img

By

Published : Jan 21, 2023, 10:00 AM IST

मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेने नागरी तंत्रज्ञानावर आधारित सोसायटी फॉर मुंबई इनक्यूबेशन लॅब टू एंटरप्रेन्योरशिप कौन्सिल बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे. या सेंटरचा उद्देश हे नाविन्यपूर्ण वस्तू, उपकरण व तंत्रज्ञान याबाबत असलेल्या नवउद्यमी यांना मदत करून नागरी पायाभूत सुविधा अधिक मजबूत करणे, हा आहे. स्माईल कौन्सिल ही संस्था नाविन्यपूर्ण स्टार्टअपद्वारे तयार केलेल्या वस्तू, उपकरण व तंत्रज्ञान यांची संबंधित विभागाच्या सहकार्याने महापालिकेमध्ये प्रायोगिक तत्वावर उपयोगात आणण्याची संधी प्रदान करते. स्माईल कौन्सिल्सच्या पहिल्या तुकडीमध्ये बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपचा समावेश आहे.

रूग्णास प्रगत कृत्रिम हात : बायोनिक होप प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने प्रगत कृत्रिम हात तयार केलेला आहे. जो इतर पर्यायांच्या तुलनेत अधिक नैसर्गिक आणि मुक्त हालचाल करण्यास मदत होते. हा कृत्रिम हात स्माईल कौन्सिलने प्रायोगिक चाचणीकरिता महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नोंदवलेल्या गरजूना उपलब्ध करुन दिलेला होता. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसाचे औचित्य साधून प्रायोगिक तत्वावर नायर रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागातील रूग्णास हा प्रगत कृत्रिम हात बसवण्यात आला. या उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून ऑर्थोपेडिक्स विभागाचे प्रोफेसर डॉ. कुमार डूसा हे कामकाज पाहत होते. या कार्यक्रमास संचालक तथा नायर रूग्णालय व दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे, प्रमुख व्यवसाय विकास शशी बाला, ऑर्थोपेडिक्स विभाग प्रमुख डॉ. आर. सी. एस. खंडेलवाल व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

नव उद्योजकांना प्रोत्साहन : आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन तसेच नाविण्यपूर्ण संशोधन करुन सर्वसामान्य नागरिकांना उपयुक्त अशा वस्तू, उपकरणे आणि तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणणाऱ्या नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेने सोसायटी फॉर मुंबई इनक्युबेशन लॅब टू आंत्रप्रेन्योरशिप कॉन्सिल बिझनेस इनक्युबेशन सेंटर ही सुविधा सुरू केली आहे.

हेही वाचा : Job In Mumbai मुंबई महापालिकेत लघुलेखक पदासाठी भरती 27 जागांसाठी होणार भरती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.