ETV Bharat / state

वांद्र्यातील इमारतीचा काही भाग कोसळला; एकाचा मृत्यू तर पाच जखमी - mla jishan siddiqui

रज्जाक चाळच्या एका इमारतीच्या काही भाग अचानक कोसळल्याची ही दुर्घटना रविवारी मध्यरात्रीनंतर जवळपास दोन वाजेच्या सुमारास घडली.

Part of building in Bandra collapsed one died
वांद्र्यातील इमारतीचा काही भाग कोसळला
author img

By

Published : Jun 7, 2021, 6:47 AM IST

Updated : Jun 7, 2021, 7:22 AM IST

मुंबई - वांद्रे येथील बहरामबाग परिसरातील एक चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत.

आमदार झिशान सिद्दीकी माध्यमांशी संवाद साधताना

रज्जाक चाळच्या एका इमारतीच्या काही भाग अचानक कोसळल्याची ही दुर्घटना रविवारी मध्यरात्रीनंतर जवळपास दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. यानंतर स्थानिक आमदार झिशान सिद्दीकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दल तसेच पोलीस पथक दाखल झाले आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मलब्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती असल्यानं काही स्थानिकांच्या मदतीनं मलबा बाजूला काढण्याचं काम अग्निशामक दलाचे जवान करत आहेत. आमदार सिद्दीकी यांनी सांगितले, मुंबई महापालिकेला मागील तीन तासांपासून याठिकाणी कामगार पाठवण्याची विनंती केली आहे. मात्र, आतापर्यंत घटनास्थळी केवळ दोन कामगार दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीने सध्या याठिकाणी काम सुरू आहे.

हेही वाचा - उपचार घेणाऱ्या बालकाचा मृत्यू कोविडमुळे नाही; नाशिक जिल्हा शल्य चिकित्सकाचा खुलासा

आधीच गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा मोठा फटका सामान्य जनतेला बसलेला आहे. मुंबईत कोरोनाने थैमान घातले आहे. अशात आता पावसाळा सुरू होताच इमारती कोसळण्याच्या तसेच इतर दुर्घटनांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

17 लोकांना बाहेर काढले -

आतापर्यंत एकूण 17 जणांना बचावण्यात आले आहे, असी माहिती मुंबई महापालिकेने दिली. तर पाच जण जखमी झाल्याचेही मनपाकडून सांगण्यात आले आहे.

Last Updated : Jun 7, 2021, 7:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.