ETV Bharat / state

वांद्रेतील एका इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही - वांद्रेतील इमारतीचा भाग कोसळला

वांद्रे पूर्व येथील निर्मलनगर म्हाडा वसाहतीतील एका इमारतीच्या गॅलरीचा भाग आज (रविवार) कोसळला. ही इमारत या आधीच रिकामी करण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या वसाहतीतील या इमारतीसह अन्य काही इमारतीच्या पुनर्विकासाला म्हाडाच्या मुंबई मंडळाने सर्व परवानग्या दिल्या आहेत.

Part of a building in Bandra collapsed
वांद्रेतील एका इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही
author img

By

Published : Jul 5, 2020, 3:33 PM IST

मुंबई - वांद्रे पूर्व येथील निर्मलनगर म्हाडा वसाहतीतील एका इमारतीच्या गॅलरीचा भाग आज (रविवार) कोसळला. ही इमारत या आधीच रिकामी करण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या वसाहतीतील या इमारतीसह अन्य काही इमारतीच्या पुनर्विकासाला म्हाडाच्या मुंबई मंडळाने सर्व परवानग्या दिल्या आहेत. मात्र, बिल्डरकडून पुनर्विकास काही मार्गी लावला जात नसून, अनेक इमारतींची दुरवस्था झाल्याने रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.

निर्मलनगर येथे 16 इमारती असून या इमारती दुरुस्तीच्या पलिकडे गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा त्वरित पुनर्विकास होणे गरजेचे आहे. पण गेल्या 15 वर्षांपासून पुनर्विकासाचे घोंगडे भिजत आहे. दरम्यान, येथील 4 ते 5 इमारतीच्या पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने वर्ष भरापूर्वीच परवानगी दिली आहे. पण अद्याप पुनर्विकास मार्गी न लागल्याची माहिती स्थानिक नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांनी दिली आहे.

अशात आज (रविवार) सकाळी 6 वाजता पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आलेल्या इमारतीपैकी एक अशा 7 क्रमांकाच्या इमारतीच्या एका बाजूच्या गॅलरीचा संपूर्ण भाग कोसळला. मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी टेरेसपासून तळमजल्यापर्यंतचा भाग कोसळला असून, या इमारतीत केवळ एक कुटुंब राहत होते. हे कुटुंब आता स्थलांतरित झाले आहे. पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या वसाहतीतील अन्य इमारतीची दुरवस्था लक्षात घेता आता पुनर्विकास लवकर मार्गी लावण्याची मागणी केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.