मुंबई : पालकांपैकी एक बहुतेकदा मुलासोबत राहतो. तथापि, नोकरी करणाऱ्या पालकांसाठी म्हणजेच आई आणि वडील दोघेही काम करत असलेल्या पालकांसाठी मुलांची काळजी घेणे अधिक आव्हानात्मक ( Parenting Tips) आहे. जेव्हा पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. तेव्हा सगळ्यात मोठी समस्या असते ती मुलाला घरी एकटं ( leave your child home alone ) सोडण्याची. अशा परिस्थितीत पालकांनी काही उपाय केले पाहीजेत. ते आज आम्ही तुम्हाला सांगत( leave child alone at home tips) आहोत.
विभक्त कुटुंब : जर तुम्ही विभक्त कुटुंबात रहात असाल आणि पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील, तर लहान वयात मुलाला घरी एकटे सोडणे टाळा. मूल थोडे मोठे असले तरी त्याला घरी एकटे सोडू नका, त्याला विश्वासार्ह व्यक्तीच्या देखरेखीखाली ठेवा. जर तुम्ही नोकर किंवा केअर टेकर ठेवत असाल तर त्याचे आधी पोलीस व्हेरिफिकेशन करून घ्या.
घरी कॅमेरा बसवा : जर नोकरदार पालक मुलाला घरी एकटे सोडून बाहेर गेले ( leaving kids home alone ) तर सर्वप्रथम घरी कॅमेरा बसवा. तुमच्या अनुपस्थितीतही तुम्ही घरातल्या मुलावर लक्ष ठेवाल, तो काय करतोय, कसा राहतोय जे जाणून घेऊ ( Install camera at home ) शकता.
मोठ्यांसोबत ठेवा : जर तुम्ही नोकरीसाठी घराबाहेर जात असाल आणि मुल घरी एकटे असेल तर मुलाची जबाबदारी कुटुंबातील मोठ्यांवर ( keep child with adults ) द्या. यामुळे मूलाला आई-वडिलांची उणीव भासत नाही आणि वडीलधारेही मुलाची चांगली काळजी घेतात.
मुलांना वेळ द्या : कामामुळे मुलाला वेळ देता येत नाही. त्याला घरी एकटे सोडून ऑफिसला निघून गेल्याने मुलाला आई-वडिलांशिवाय एकटे वाटू लागते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी किंवा एखाद्या खास प्रसंगी मुलासोबत वेळ घालवा. त्याला फिरायला घेऊन जा किंवा शाळेच्या उपक्रमात सामील व्हा.
सतत संपर्कात राहा : जरी तुम्ही दररोज कामानिमित्त मुलाला घरी सोडले, तरी त्याच्याशी वेळोवेळी फोनद्वारे संपर्कात राहा. करा आणि त्यांच्या स्थितीबद्दल विचारपूस करत राहा. ज्यानेकरून तुम्हाला त्याच्या प्रत्येक गोष्टीची अपडेच मिळत राहील.