ETV Bharat / state

मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची वर्णी - आयुक्तपदी

1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लिनचिट सिंग यांनीच दिली होती.

परमबीर सिंग
नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमबीर सिंग
author img

By

Published : Feb 29, 2020, 12:33 PM IST

Updated : Feb 29, 2020, 12:50 PM IST

मुंबई - मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून संजय बर्वे निवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांची वर्णी लागली आहे. जून 2022 पर्यंत यांचा आयुक्त पदावर कार्यकाळ राहणार आहे.

परमबीर सिंग हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून सिंग यांची ओळख आहे. गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या सरकारमधील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. लाललुचत प्रतिबंधक विभागापूर्वी त्यांनी ठाण्याचे आयुक्त म्हणून काम पाहिले होते. त्यांच्याच कार्यकाळात अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यस्थेचा यापदी नेमण्यात आले.

अतिरिक्त पोलीस महासंचालक असताना कोरेगाव भीमा प्रकरणात त्यांनी स्वतः लक्ष घालत हे प्रकरण हाताळले होते. गेल्यावर्षीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून नेमण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात क्लिनचिट सिंग यांनीच दिली होती. अखेर परमबीर सिंग यांच्या गळ्यात मुंबईच्या आयुक्तपदाची माळ पडलेली आहे.

हेही वाचा - मुंबईचे मावळते पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना निरोप

Last Updated : Feb 29, 2020, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.