ETV Bharat / state

Dhirendra Shastri Accepted Challenge : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकारले श्याम मानवांचे आव्हान - श्याम मानवांचे अव्हान स्वीकारले

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचे आव्हान पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी स्वीकारले आहे. गेल्या बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींनी 'रामकथेच्या नावाने' अंधश्रद्धेचा खेळ सुरू केला होता असा, आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. एवढेच नाही तर धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास त्यांना ३० लाख देऊ असे आवाहन देखील देण्यात आले आहे.

Dhirendra Shastri Accepted Challenge
Dhirendra Shastri Accepted Challenge
author img

By

Published : Jan 19, 2023, 6:19 PM IST

Updated : Jan 19, 2023, 7:41 PM IST

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकारले श्याम मानवांचे अव्हान

रायपुर : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरात कथेदरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानासंदर्भात वक्तव्य केले आहे. नागपुरात आमची कथा सात दिवसांचीच होती. ती पूर्ण करुनच आम्ही परतलो. आम्ही कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. आम्हाला बदनाम करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांची मानसिकता छोटी असून त्यांचे अव्हान मी स्वीकारतो असे ते रायपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

श्याम मानवांचे अव्हान स्वीकारले : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली आहे. तर नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सात दिवसच रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. कथा पूर्ण करून पुढच्या प्रवासाला निघालो. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वाद निर्माण केला. मी कथा सोडून पळालेलो नाही. मी तिथे होतो तेव्हा ते कार्यकर्ते का आले नाहीत, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाखांचे बक्षीस : धीरेंद्र शास्त्रींनी किमान दहा लोकांवर चमत्कार सिद्ध केल्यास ३० लाख देऊ असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आले होते. आता पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रीं यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन स्वीकारले. रायपूर छत्तीसगड मध्ये 20 आणि 21 जानेवारीला बागेश्वर धामकडून दिव्य दरबार भरवला जाणार आहे.

सनातनी धर्म पूर्णपणे अहिंसक : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की धर्मांतर रोखण्यासाठी अंतर्गत तसेच ग्रामीण भागात नवीन विचारधारा आणण्यासाठी दर 2 महिन्यांनी 3 दिवसांची कथा आयोजित केली जात आहे. धर्मांतर थांबवता येईल. ख्रिश्चन धर्माला झालेले अनेक हिंदू परत धर्मांत आल्याचा दावा त्यांनी केला. भविष्यातही अखंड कथांचे आयोजन केले जाईल असे ते म्हणाले.

मी देव नाही : पुढे बोलताना पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, मी देव नाही. आम्ही तुमच्या समस्या सोडवू शकतो असाही दावा आमचा नाही. आम्ही आमच्या प्रियजनांचे प्रश्न सोडवतो. धर्माचा प्रचार करण्यात गैर काय आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. सनातन धर्माला लक्ष्य करण्यासाठी हा सुनियोजित कट आहे. अम्ही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही असे देखील ते म्हणाले.

स्वत:ला देव म्हणणे अंधश्रद्धा : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीबाबत बाबा म्हणाले की, विराट कोहली कुटुंबासह वृंदावनात बाबा नीम करौलीच्या दर्शनासाठी गेला होता. ऋषीमुनींचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्याने दोन शतके झळकावल्याचा दावा बाबांनी केला. तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकाबाबत ते म्हणाले माणूस स्वतःला देव म्हणवतो ही अंधश्रद्धा आहे.

कागदावर सोडवतात प्रश्न : धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री लोकांचे मन वाचत असल्याचा दावा करतात. बागेश्वर धामच्या दैवी दरबारात एकदा अर्ज केला की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे.

हेही वाचा - Controversy of Bageshwar Dham : धीरेंद्र शास्त्रींच्या दाव्यांची महाराष्ट्राने केली पोलखोल, एकच सवाल चमत्कार कधी दिसणार

Last Updated : Jan 19, 2023, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.