मुंबई - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जो आदेश देतील तो मला मान्य असेल, असे स्पष्टीकरण आज अजित पवार यांनी दिले. त्यामुळे अजित पवार राजकारणातच सक्रिय राहणार असल्याचे दिसते आहे. पवारसाहेब हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. त्यांचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च असल्याचे अजित पवार म्हणाले.
माझ्यामुळे साहेबांची बदनामी झाली म्हणून, मी अस्वस्थ होतो. त्याच अस्वस्थेतून मी राजीनामा दिला असल्याचे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार यांनी काल (शुक्रवारी) राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
आमचा पवार परिवार हा मोठा आहे. आमच्या कुटुंबात साहेब सांगितल तेच आम्ही मान्य करतो. उगीच आमच्या घरात गृहकलह असल्याच्या चर्चा लोक करत आहेत. आमच्यात कोणतेही कौटुंबीक वाद नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आम्ही पण माणसचं आहोत, अजित पवारांना अश्रू अनावर
अजित पवार यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केला, अजित पवार यांनी २५ हजार कोटींचा घोटाळा केला. असे विरोधक म्हणत आहेत. आम्ही पण माणसेच आहोत. आम्हाला पण भावना आहेत हे सांगताना अजित पवार यांना भावना अनावर झाल्या.
पूर आल्यामुळे मी बारामतीत होतो
शुक्रवारी शरद पवार यांच्याबरोबर अजित पवार का आले नाहीत असा सर्वत्र बातम्या येत होत्या. मात्र, मी काल बारामतीत पूरस्थिती निर्माण झाली होती. म्हणून मी मतदारसंघात होतो. मात्र, कीहींनी त्याचा चुकीचा समज काढला असल्याचे अजित पवार म्हणाले.