ETV Bharat / state

wet drought : राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार कधी ? विरोधकांचा सरकारला प्रश्न.. - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे

राज्यात यावर्षी परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारी आणि विरोधकाच्या नेते मंडळांची सध्या पाहणी दौरे देखील सुरू आहेत. विरोधकांकडून सातत्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात असताना राज्य सरकार या मागणीसाठी गंभीर नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

wet drought
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
author img

By

Published : Oct 28, 2022, 6:04 PM IST

Updated : Oct 28, 2022, 7:48 PM IST

मुंबई - राज्यात यावर्षी परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारी आणि विरोधकाच्या नेते मंडळांची सध्या पाहणी दौरे देखील सुरू आहेत. विरोधकांकडून सातत्याने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात असताना राज्य सरकार या मागणीसाठी गंभीर नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनीकेली आहे.

परतीच्या पावसामुळे प्रचंड नुकसान - दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना झोडपून काढले. ऐन दिवाळीच्या तोंडाशी शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक परतीच्या पावसामुळे हातातून निघून गेले आहे. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र सहित अनेक ठिकाणी परतीच्या पावसाचा फटका जास्त प्रमाणात बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीही जाऊन करत आहेत. दिवाळी समताच विरोधी पक्षाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी दौरे सुरू केले आहेत. माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे ( Formor minister Aditya thackeray ) यांनी नुकताच अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यातून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच या दौऱ्यातून पुन्हा एकदा राज्य सरकारने तात्काळ राज्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही निर्णय घेत नाही, असा आरोप देखील ठाकरे यांनी आपल्या दौऱ्यातून केला आहे.

Formor minister Aditya thackeray
आदित्य ठाकरे यांचा नुकसानग्रस्त भागाची पाहणी दौरा

अजित पवार यांची ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी - राज्यभरात अतिमुसळधार परतीच्या पावसामळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून लवकरात लवकर राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, असे पत्र विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit pawar ) यांनी राज्य सरकारला लिहिले होते. मात्र राज्य सरकारने याबाबत कोणतीही गंभीर दखल घेतलेली नाही. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांविषयी हे सरकार गंभीर नाही. परतीच्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी जयंत पाटील आणि अजित पवार करत आहेत. मात्र त्या मागणीची दखल घेतली जात नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे ( NCP Spokesperson Mahesh tapase ) यांनी व्यक्त केले आहे.

wet drought
ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन - नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे राज्य सरकार ठामपणे उभा आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तशी माहिती द्यावी त्यांचे पंचनामे तातडीने जिल्हाधिकाऱ्याकडून केले जाईल. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत राज्य सरकार शेतकऱ्यांना करत असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. तसेच परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झालेले आहे, यासाठी राज्य सरकार तातडीने शेतकऱ्यांना मदतही पोहोचवत आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही, असे देखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष - ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ असे दोन प्रकारचे दुष्काळाचे प्रकार आहेत. एखादा भागात सातत्याने जोरदार पाऊस पडत असेल, या पावसामुळे ठराविक परिसरात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाला असेल. आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झालं असेल. शेतकऱ्यांच्या शेतातलं उभं पीक पावसामुळे वाहून गेलं. शेतात तळ्यासारखं पाणी साठलं असेल. तसेच जिथे पिण्याच्या पाण्याचे पानवटे आहेत, ते देखील पडणाऱ्या पावसामुळे दूषित झाले असतील, अशा परिस्थितीत त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर केला जातो. 65 मिलीमीटर पेक्षा अधिकचा पाऊस एखाद्या परिसरात पडल्यास तिथे अतिवृष्टी म्हणून जाहीर केली जाते. तसेच या अतिवृष्टीमुळे संबंधित परिसरामध्ये जवळपास 35 टक्के होऊन अधिक पिकाची नुकसान झाली असल्यास त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करता येतो.

Last Updated : Oct 28, 2022, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.