मुंबई - विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडियातील मतभेद सातत्याने समोर येतात. मुंबईतील बैठकीचे आयोजन कुणी करावे, याबाबतही काँग्रेस व ठाकरे गटात मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. ही बैठक घेण्याची काँग्रेससह ठाकरे गटाने तयारी दाखविली आहे.
इंडियाच्या बैठकीविषयी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत की, आमच्यासाठी ही फार महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीबाबत आम्ही फार उत्सुक आहोत. जर ही बैठक होस्ट (यजमानपद) करण्यासाठी आम्हाला संधी भेटली तर त्यापेक्षा मोठा आनंद असणार नाही. या बैठकीविषयी आज सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहोत. बैठकीबाबत शरद पवार यांच्या चर्चा केली जाईल. पुढे नाना पटोले यांनी सांगितले आहे की, सोमवारी या बैठकी संदर्भात चर्चा करण्यासाठी ते दिल्लीला जाणार आहोत. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी या बैठकीबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी विरोधी पक्षातील किती पक्ष एकत्र येतील, याची माहिती सुद्धा दिल्लीतून समजणार असल्याचेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले आहे.
आमचा कोणी हात धरू शकत नाही- एकीकडे ही बैठक होस्ट करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असताना दुसरीकडे ही बैठक होस्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे गटसुद्धा सक्रिय झाला आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार सचिन अहिर म्हणाले, की, बैठकीचे आयोजन करण्याबाबत आमचा हात कोणी धरू शकत नाही, हे सर्वांना माहीत आहे. अशा पद्धतीच्या बैठका आम्ही योग्य पद्धतीने हाताळल्या आहेत. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभ व मुंबईत निघालेले महामोर्चे आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये योग्य रीतीने हाताळली आहेत. त्या कारणाने यंदा इंडियाची मुंबईत होणारी बैठक आम्ही होस्ट करावी, अशी आमची इच्छा आहे. नाना पटोले जर या बैठकी संदर्भामध्ये शरद पवार यांना भेटत असतील तर त्यांच्या भेटीनंतर त्यांना उद्धव ठाकरे यांनासुद्धा भेटावे लागणार आहे. तसेच मुंबईत बैठक आयोजित करण्याबाबत प्रस्ताव सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आमदार अहिर यांनी दिली आहे.
यापूर्वी पाटणा व बंगळुरू येथे बैठका- यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने पाटणा येथे २३ जून रोजी पहिली बैठक आयोजित केली होती. त्यानंतर दुसरी बैठक ही १८ व १९ जुलै रोजी बंगळुरू येथे झाली होती. ही बैठक काँग्रेसने आयोजित केली होती. या कारणाने मुंबईत होणारी तिसऱ्या बैठकीचे आयोजन करण्यासाठी उद्धव ठाकरे गट आग्रही आहे.
हेही वाचा-