ETV Bharat / state

मुख्यमंत्री देशावर बोलले पण महाराष्ट्रावर चकार शब्द काढला नाही - देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री हे निवडणुकीतील चौकावरील भाषण करतात, ते सदनामधील मुद्देसूद भाषण करत नाहीत, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांसमोर केली.

Fadnavis criticizes Cm Uddhav Thackeray
मुंबई
author img

By

Published : Mar 3, 2021, 8:36 PM IST

मुंबई - राम मंदिराच्या निधी संकलनावर शिवसेनेकडून टीका केली जात आहे. पण, खंडणीखोरांना समर्पणनिधीतील भाव समजणार तरी कसा आणि मुख्यमंत्री हे निवडणुकीतील चौकावरील भाषण करतात, ते सदनामधील मुद्देसूद भाषण करत नाहीत अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांसमोर केली.

मुंबई

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर सभागृहात दिले, त्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र येऊ शकले नाहीत. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाहीत. मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले, पूर्वी ते नवीन होते. पण, चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण या दोन्हींतील अंतर त्यांना अजूनही समजलेले नाही. शेतकर्‍यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकर्‍यांची चिंता आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे भाषणसुद्धा दिशाहीन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात ते जे बोलले ते उसने अवसान आणून खोटे बोलले. सत्य त्यांना ठावूक आहे. या संपूर्ण भाषणात महाराष्ट्राच्या एकाही प्रश्नाला त्यांनी हात लावला नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारने दिलेले राज्यपालांचे भाषण जसे दिशा देणारे नव्हते, तसेच आजच्या मुख्यमंत्र्यांचे भाषणसुद्धा दिशाहीन होते. त्यांनी महाराष्ट्राची संपूर्णपणे निराशा केली. आम्ही गैरप्रकार दाखविला, भ्रष्टाचार काढला तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणतात. आमच्यामुळे भ्रष्टाचार बाहेर आला तरच महाराष्ट्र वाचेल. आपल्या भाषणाची चीरफाड होऊ नये, म्हणून त्यांनी आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.