मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर ( Shivneri Fort Pune ) झाला, तिथले खासदार अमोल कोल्हे आहेत. रायरेश्वरवर शपथ घेतली तो किल्ला खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule ) यांच्या भोर मतदार संघात येतो. प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी ( Chhatrapati Shivaji Maharaj ) काढला तो किल्ला खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मतदारसंघात आहे. तर, हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड स्थापन केली ती राजधानी खासदार सुनिल तटकरे यांच्या मतदार संघातच आहे आणि हे सर्व खासदार राष्ट्रवादीचे ( Nationalist Congress Party ) आहेत. त्यामुळे पक्ष एक नंबरवर न्यायचा असेल, तर आपापसातील मतभेद संपवा आणि दोन पावले मागे या, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
शरद पवार हे दूरदृष्टी असलेले माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राला ५० वर्षे पुढे नेण्याचे काम शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांनी केले. शिवाय राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिकाही बजावली. यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan ) यांच्यानंतर दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री म्हणून शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांच्याकडे पाहिले गेले आहे. दूरदृष्टी ठेवत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने वास्तू उभी करायची कल्पना आणली. ती सत्यात उतरवली हेच त्यांच्या कामाचे गमक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi ) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बोट धरुन राजकारणात पुढे आल्याचे सांगतात. त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे. मात्र त्यांच्या मनात शरद पवार ( Nationalist Congress Party Chief Sharad Pawar ) यांच्याबाबत असलेले स्थान लक्षात घेतले पाहिजे असेही अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar Appeal To Party Workers ) यांनी आवर्जून सांगितले. दरम्यान येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आपल्या विचारांचे लोक निवडून कसे येतील असा निश्चय करुया असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.