मुंबई- केईएम आणि टाटा हॉस्पिटलमधील 60 ओपीडी रूग्णांना बाहेर काढले गेले असून त्यांना हिंदमाता उड्डाणपुलाखाली हलविण्यात आले आहे. कोरोनाची गंभीर स्थिती पाहता मुंबई महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता या रुग्णालयांमध्ये ओपीडी रुग्णांचे प्रवेश थांबविण्यात आले आहेत.
रुग्णालयात कोरोना रूग्णांना इतर रुग्णांपेक्षा जास्त प्राधान्य दिले जात आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे बीएमसीने उड्डाणपुलाच्या खाली हलविलेल्या रूग्णांना शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, तिकडे जाण्यासाठी त्या रुग्णाकडून पैसे घेतले जात आहेत.
शनिवारी अन्नाचे पॅकेट्स मिळाल्या नंतर काहीही खाल्ले नाही, असे रुग्णांनी सांगितले. रुग्णांसाठी वेगळी शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही. उघड्यावर शौचास जाण्याशिवाय पर्याय नाही,अशी रुग्णांची तक्रार आहे. सरकारने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रुग्णांनी सरकाकरकडे केलीय.