ETV Bharat / state

कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांचे हाल, मुंबईत फक्त 100 रुग्णवाहिका सुरू - लॉकडाऊन

रूग्णवाहिका रस्त्यावर नसल्यामुळे या परिस्थितीचा आढावा भाजप नेते किरीट सोमैया यांनी चौकशी केली असता, मुंबईत सध्या 3 हजार रुग्णवाहिकापैकी फक्त 100 रुग्णवाहिका उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Mumbai
कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांचे हाल
author img

By

Published : Apr 6, 2020, 5:18 PM IST

मुंबई - करोनाव्यतिरिक्त आरोग्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी असलेल्या रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकांना नसल्यामुळे मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कोरोनाच्या भीतीने रुग्णवाहिका चालक रूग्णवाहिका घेऊन येत नसल्याचे समोर आले आहे. तर खासगी रुग्णवाहिका चालक पोलीस परवानगी देत नसल्याचे कारण सांगत रुग्णवाहिका रस्त्यावर उतरवत नाहीत. त्यामुळे वेळेवर उपचार मिळत नसल्याने रूग्णांचा जीव धोक्यात येत आहे.

मुंबईत फक्त 100 रुग्णवाहिका सुरू

त्यामुळे रूग्णवाहिका रस्त्यावर नसल्यामुळे या परिस्थितीचा आढावा भाजप नेते किरीट सोमैया यांनी चौकशी केली असता, मुंबईत सध्या 3 हजार रुग्णवाहिकापैकी फक्त 100 रुग्णवाहिका उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आणि कोरोनाचा भीतीने 2 हजार 900 रुग्णवाहिका या रस्त्यावरून गायब झाल्याचे चित्र आहे. रुग्णाला अनेक तास रूग्णवाहिकेसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. नाहीतर रूग्णालयात पोहोचण्यासाठी ऑटो रिक्षा किंवा इतर वाहने वापरून रूग्णालयात पोहचावे लागत आहे. त्यामुळे रुग्णालयाकडून वारंवार विनंती करूनही महापालिका व महाराष्ट्र सरकार कोरोना व इतर रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप किरीट सोमैया यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.