ETV Bharat / state

Devendra Fadnavis Criticized Government : 'आता संघर्षा शिवाय पर्याय नाही', फडणवीस यांची ठाकरे सरकारवर कडाडून टीका

महाराष्ट्राचे पुरोगामित्व आता संपले (Maharashtra's progress is over) आहे. यांच्या बरोबर आता संघर्ष केल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही (Now we have no choice but to fight ). आमच्याशी ठोकशाहीने वागाल तर तसेच उत्तर देऊ. (So let's answer as well) असे सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) कडाडून टीका केली आहे

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 25, 2022, 1:55 PM IST

Updated : Apr 25, 2022, 4:25 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात ज्या पद्धतीने पोलिसांचा वापर करून विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानंतर आता त्यांच्याशी संवादाला जागाच राहत नाही. त्यामुळे आज गृहमंत्र्यांनी बोकावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत आम्ही गेलो नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'सरकारशी बोलायला संवादात जागाच नाही' - याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईत, महाराष्ट्रात ज्या घटना होत आहेत, त्या बघितल्यानंतर या सरकारने संवादात आत्ता जागा ठेवली नाही, असे आम्हाला वाटते. जर कोणी हिटलरी प्रवृत्तीस वागायचं ठरवलं असेल तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा अशा प्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला. मुळातच विरोधी पक्षाला जिवानिशी संपायचं अशा प्रकारची प्रवृत्ती सरकारची असेल आणि सरकारी पक्षाचे लोक पोलीस संरक्षणामध्ये आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचे काम करतात. ते पोलिसांच्या समक्ष हल्ले करणार असतील आणि त्यानंतरही त्यासंदर्भात एफआयआर नोंदवण्यात आम्हाला संघर्ष करावा लागत असेल, तर मग अशा परिस्थितीमध्ये अशा बैठकीमध्ये जाऊन फायदा काय? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस

'या सरकारला लोकशाही मान्य नाही' - महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही. आम्ही पोल-खोल यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून मुंबई महानगर पालिकेतील सगळा भ्रष्टाचार आम्ही जनतेपुढे मांडला. लोकशाहीमध्ये यापेक्षा वेगळं काय करायचं त्यांना लोकशाही मान्य नाही त्यांनी आमच्या पोल-खोल सभावर हल्ला केला. आमच्या रथावर हल्ला केला आणि त्यांना असं वाटतंय की अशा प्रकारचे हल्ले करून आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणे बंद करू हा गैरसमज त्यांनी काढून टाकावा. आमची भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई सुरूच राहील. ज्याप्रकारे किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. पोलिसांच्या समक्ष प्रोटेक्ट करा असे त्यांना इन्फॉर्म केल्यानंतरही त्यांच्यावर हल्ला होतो किंवा मोहित कंबोज यांच्यावर ही हल्ल्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या गोष्टी आपण जर बघितले तर राज्यांमध्ये सर्वत्र भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना टार्गेट करून त्यांच्यावर केसेस नोंदवल्या जात आहे.

ज्या बैठकीला मुख्यमंत्री नाहीत त्या बैठकीचा काय उपयोग? - पोलिसांचा गैरउपयोग हा मोठ्या प्रमाणात चालला आहे. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर हे सर्व चालले आहे, असा आरोप करत या बैठकीला मुख्यमंत्रीच नाहीत त्या बैठकीमध्ये गृहमंत्री आम्हाला काय सांगणार आणि कोणता निर्णय घेणार आहेत. इतक्या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री नसतील तर ही बैठक म्हणजे निव्वळ टाईमपास आहे का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला. अत्यंत गंभीर गोष्ट आहे याप्रकारे आमदार, खासदार हनुमान चालीसा म्हणत असतील तर त्यांनी महाराष्ट्रात नाही तर पाकिस्तानात जाऊन म्हणायची का? त्यात त्यांनी त्यांच्या घरासमोर जाऊन वाचणे हे योग्य की अयोग्य हा विषय दुसरा. एका स्त्री करता हजारो लोक एकत्र येतात, त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलीस अटक करतात. जणूकाही पाकिस्तान सोबत युद्ध जिंकल्यासारखा जल्लोष करतात, असेही ते म्हणाले.

आत्ता तरी मुख्यमंत्र्यांनी आजीचा आक्रोश ऐकावा - मुख्यमंत्री आजीकडे गेले ठीक आहे. महाराष्ट्रमध्ये कित्तीतरी आत्महत्या झाल्या आहेत. उद्धवजी त्या महिलेच्या घरी गेले ती आक्रोश करत होती. माझ्या मुलाला नोकरी नाही, मला घर नाही. निदान मुख्यमंत्र्यांनी तिचा आक्रोश तरी समजून घ्यावा. तिला मदत करावी. त्याच बरोबर इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरी गेला असता तर समजलो असतो. एस टी कामगारांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरी जायला हवं होतं.

हनुमान चालीसा पठण करणे म्हणजे राजद्रोह का? - एका महिला खासदाराला नामोहरम करण्याकरता पहिल्या दिवशी एफआयआरमध्ये वेगळं कलम नंतर वेगळे कलम. हनुमान चालीसा म्हटल्यामुळे राज्यात राजद्रोहाचा गुन्हा नोंदवला जात असेल तर असे गुन्हे स्वीकारायला आम्ही तयार आहोत. नवनीत राणा यांच्याकडून माहिती मिळाली आहे की, त्यांना जेलमध्ये अत्यंत हीन वागणूक देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी या संदर्भात त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून देशाच्या संसदेचे सभापती त्यांच्याकडे तक्रार केली आहे. लोकशाहीबद्दल ओरडणारे सगळे कुठे आहेत. एका महिलेला हनुमान चालीसा म्हणते म्हणून अशाप्रकारे त्यांना वागणूक दिली जात असेल आणि त्यात दलित असल्याची जाणीव त्यांना करून दिली जात असेल, तर या महाराष्ट्राचे पुरोगामित्व आता संपलेल आहे, असे म्हणण्याची अवस्था आज या ठिकाणी आहे. अशा या सरकारच्या संदर्भात आता संघर्ष शिवाय आम्हाला पर्याय नाही. खरं म्हणजे जर सरकार मधल्या लोकांना वाटत असेल की गुंडशाही आणि झुंडशाहीला मी घाबरून जाऊ तर आम्ही आमची ताकत दाखवू. तेवढेच जर सरकारला वाटत असेल तर जशास तसे उत्तर पाहिजे तर ते देण्याची ताकद आणि हिम्मत भारतीय जनता पक्षामध्ये आहे हे स्पष्टपणे सांगतो, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत. लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो. आमच्याशी ठोकशाही ने वागाल तर आम्ही ही ठोकशाही ने त्याला उत्तर देऊ, असेही फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : Kirit Somaiya Attack Case : नवनीत राणा ते शिवसैनिकांचा हल्ला; किरीट सोमैयांनी का केली दिल्लीवारी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Last Updated : Apr 25, 2022, 4:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.