ETV Bharat / state

मराठी भाषा दिवस : अमराठी पालकांची मराठी शाळांना नवसंजीवनी, मराठी भाषिकांनी फिरवली पाठ - मराठी शाळा कांजूरमार्ग मुंबई

कांजूरमार्ग आणि विक्रोळीमधील वैभव विद्यालय आणि विकास हायस्कूल या मराठी शाळेत इतर भाषिक मुलांनी प्रवेश घेऊन या शाळेमध्येही मुलांचा विकास होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे. कर्वेनगर येथील वैभव विद्यालयात इतर भाषिक विद्यार्थ्यांची संख्या 2019-2020 च्या पटसंख्येनुसार 25 टक्के आहे. या विद्यालयातील एकूण विद्यार्थी संख्या 300 पेक्षा जास्त आहे. त्यामध्ये लहान मुलांपासून ते दहावीपर्यंत 64 अमराठी विद्यार्थी आहेत. यामध्ये हिंदी, तमिळ, गुजराती, तेलगू, कन्नड, बंगाली मातृभाषा असणारे विद्यार्थी आहेत.

marathi school kanjurmarg mumbai
अमराठी पालकांची मराठी शाळांना नवसंजीवनी
author img

By

Published : Feb 28, 2020, 9:19 AM IST

मुंबई - इंग्रजी माध्यमाच्या नादात मराठी भाषिक पालकांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मराठी शाळा बंद पडणार असल्याची ओरड सुरू आहे. अनेक शाळा बंद देखील पडल्या आहेत, तर कित्येक शाळेमधील पटसंख्या खालावली आहे. हे होत असताना अमराठी परप्रांतीय पालकांनी मराठी शाळांना नवसंजीवनी दिली आहे. कांजूरमार्गमधील वैभव विद्यालय या मराठी शाळेत तब्बल 64 अमराठी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे परप्रांतीय म्हणून दुसर्‍यांना हिणवणार्‍या पालकांना चपराक बसली आहे.

मराठी भाषा दिवस : अमराठी पालकांची मराठी शाळांना नवसंजीवनी, मराठी भाषिकांनी फिरवली पाठ

कांजूरमार्ग आणि विक्रोळीमधील वैभव विद्यालय आणि विकास हायस्कूल या मराठी शाळेत इतर भाषिक मुलांनी प्रवेश घेऊन या शाळेमध्येही विकास होऊ शकते हे दाखवून दिले आहे. कर्वेनगर येथील वैभव विद्यालयात इतर भाषिक विद्यार्थ्यांची संख्या 2019-2020 च्या पटसंख्येनुसार 25 टक्के आहे. या विद्यालयातील एकूण विद्यार्थी संख्या 300 पेक्षा जास्त आहे. त्यामध्ये लहान मुलांपासून ते दहावीपर्यंत 64 अमराठी विद्यार्थी आहेत. यामध्ये हिंदी, तमिळ, गुजराती, तेलुगू, कन्नड, बंगाली मातृभाषा असणारे विद्यार्थी आहेत. शाळेत शिकणारे विद्यार्थी अत्यंत गरीब घरातील आहेत. दुसरीकडे विक्रोळीतील विकास हायस्कूलच्या प्राथमिक विभागामध्येही इतर भाषिक विद्यार्थी आहेत. यावर्षी या शाळेत 10 विद्यार्थी हिंदी भाषिक आहेत.

या शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर शिस्तही लावली जाते. महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठी शिकलेच पाहिजे. मराठी शाळेत असूनही आम्हाला चांगल्या दर्जाचे इंग्रजी शिकविले जाते. माझी आई कारखान्यात, तर वडील वाहनचालक आहेत. माझा शिक्षणाचा खर्च शाळा उचलत असल्यामुळे त्यांच्यावर माझ्या शिक्षणाचा कोणताही भार येत नाही. माझी प्रगती पाहून माझ्या लहान भावलाही याच शाळेत शिशू वर्गात दाखल केले आहे, असे अरिफा शेख या विद्यार्थिनीने सांगितले.

मराठी शाळेत गेला आणि वाया गेला असे काही नसते. इतर भाषिक मुले आज मराठी शाळेत शिकतात याचा आनंद आहे. मात्र, मराठी माणसानेच या शाळांकडे पाठ फिरवली याचे दुःख आहे. मराठी शाळा जगविण्यासाठी राज्य सरकाने पाऊल उचलले पाहिजे. आमच्या शाळेत अनेक गोष्टी शिकविल्या जातात. इंग्रजी माध्यमांच्या स्पर्धेत आम्ही कुठेही मागे नाही, असे वैभव विद्यालयाचे संस्थाचालक बाळासाहेब हांडे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.