ETV Bharat / state

नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणासाठीही कोर्टाचा दिलासा नाहीच, मागितले रिपोर्ट्स - मेडिकल ग्राउंडवर युक्तिवाद

नवाब मलिक यांना आजही कोर्टाने दिलासा दिला नाही. मेडिकल ग्राउंडवर युक्तिवाद करण्यात आला. मात्र रिपोर्ट कुठे आहेत, असा सवाल न्यायालयाने केला. उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. किडन्या खराब झाल्याचे वैद्यकीय रेकॉर्ड याचिकेत जोडावे असे न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

नवाब मलिक
नवाब मलिक
author img

By

Published : Jun 13, 2023, 9:10 PM IST

मुंबई - कथित दहशतवादी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार नवाब मलिक हे न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. वैद्यकीय कारणास्तव ते रुग्णालयात दाखल आहेत. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाली.अत्यंत मुद्देसूद रीतीने मालिक यांच्या बाजूने युक्तिवाद केला. मात्र याचिकेमध्ये केलेल्या दाव्याच्या समर्थनार्थ वैद्यकीय अहवाल आणि त्याचे कागदपत्र हे संपूर्ण रीतीने जोडले नसल्यामुळे उद्या पुन्हा याचिकेच्या संदर्भात सुनावणी निश्चित केलेली आहे.

न्यायालयात आज काय झाले - नबाब मलिक वैद्यकीय कारणास्तव दवाखान्यामध्ये दाखल आहेत. त्यांना जामीन मिळावा असा त्यांनी अर्ज उच्च न्यायालयात केला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांनी महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. त्यांनी आजच्या अल्पशा झालेल्या चर्चेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वाच्या परिपत्रकाचा संदर्भ दिला. सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एक परिपत्रक जारी केलेले आहे. त्यामध्ये निर्देश दिलेले आहेत की जामीन अर्जासंदर्भातील अशा सुनावण्या केवळ दहा मिनिटे या कालावधीतच आटोपाव्या अन्यथा त्यापेक्षा जास्त वेळ लागायला नको. न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई मालिक यांच्या वकिलांना म्हणाल्या की, गुणवत्तावर आधारित युक्तिवाद करावा म्हणजे वेळेत होईल. तसेच केवळ मेडिकल आणि गुणवत्ताआधारे विधान केल्यास वेळ वाचेल. मालिक यांचे वाकिल अमित देसाई यांनी न्यायालयाची सूचना मान्य करत युक्तिवाद केला.

न्यायालयाचा सवाल आणि नवाब मलिक यांच्या वकिलांचे जवाब - मलिक यांना कसे आणि केव्हा ईडीकडून अटक केली गेली. मालिक सध्या वैद्यकीय नियमित तपासणी आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. कारण त्यांच्या किडन्या खराब नाकामी झाल्या आहेत. त्याबाबत विशेष रुग्णालयात उपचारासाठी मलिक यांना दाखल केले आहे. वास्तविक आधी एक किडनी खराब झाली. मात्र दुसरी किडनी केवळ 60 टक्के काम करीत आहे. म्हणजेच 40 टक्के नियमित रीतीने काम करत नाहीय. हे वास्तव देखील मलिक यांच्या दाव्यात वाकील देसाई यांनी मांडले.

आज रोजी काय स्थिती आहे? - न्यायालयाने मलिक यांच्याबाबत दुसरा प्रश्न विचारला. तेव्हा वाकिल अमित देसाई उत्तरले ती, 24 तास ते डॉक्टरांच्या देखरेख खाली आहेत. वेळोवेळी औषध त्यांना जरुरी आहे. त्यांना मधुमेह देखील आहे. दोन्ही आजार असल्याने शारीरिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यांच्या मूत्र मार्गाला जंतुसंसर्ग देखील झाला आहे. ईडीकडून मात्र ह्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते. ट्रायल कोर्टमध्ये सुनावणी झाली नाही तसेच इकडे होऊ शकली. म्हणून आज वैद्यकीय स्थिती आधारे जामीन मिळण्यासाठी म्हणणं मांडत असल्याचे वाकिल अमित देसाई यांनी मांडले.

न्यायालयाने प्रश्न केला की स्थिती चिंताजनक आहे असे दाखवणारे अहवालात कुठे नमूद केले आहे ते काही स्पष्ट होत नाही. अमित देसाई उत्तरले, ते 4 महिनेपासून व्यवस्थित बसू शकत नाही. 60 टक्के किडनी खराब झाली हे स्पष्ट होत नाही असा प्रश्न देखील न्यायालयाने विचारला तेव्हा पुन्हा ज्येष्ठ वाकिल अमित देसाई यांनी न्यायालयासमोर सर्व ते कागदपत्रे तथ्य मांडले. शारीरिक स्थिती गंभीर असल्याचे म्हटले. मात्र ईडीने तरीही जामीम अर्जाला विरोध केला. वैद्यकीय अहवालात पुरेसे कागदपत्रे रेकॉर्ड प्रतिवादी ईडीकडे देखील द्यावे आणि ते सर्व कागदपत्रे एकाच संपूर्ण अहवालात जोडून सबमिशन करून मग उद्या पुन्हा सुनावणी करू, असे न्यायालयाने म्हटले. मात्र या संदर्भातले सर्व वैद्यकीय कागदपत्रे याचिकेसोबत त्वरित जोडण्याचे निर्देश देखील सुनावणी दरम्यान त्यांनी दिले. आता यावर उद्या पुन्हा सुनावणी होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.