ETV Bharat / state

मुंबईकरांना गणपती बाप्पा पावला, रुग्णसंख्येत वाढ नाही - गणेशोत्सव

मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसरी लाट येईल, गणेशोत्सव संपल्यावर रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मुंबईत सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने मुंबईकरांना गणपती बाप्पा पावल्याचे दिसत आहे. मुंबईत रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी पालिका सतर्क असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

c
cc
author img

By

Published : Sep 28, 2021, 10:07 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच तिसरी लाट येईल, गणेशोत्सव संपल्यावर रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मुंबईत सध्या रुग्णसंख्या आटोक्यात असल्याने मुंबईकरांना गणपती बाप्पा पावल्याचे दिसत आहे. मुंबईत रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी पालिका सतर्क असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना विषाणूची दुसरी लाट मुंबईत आली. या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात दिवसाला 10 ते 11 हजार रुग्ण आढळून येत होते. ऑगस्टपासून त्यात घट झाली आहे. सध्या कोरोनाचे 400 ते 500 रुग्ण आढळून येत आहेत. नुकताच गणेशोत्सव सण साजरा करण्यात आला. या सणादरम्यान नागरिक एकत्र आल्याने तसेच मुंबईमधील नागरिक कोकणात गणेशोत्सवाला गेल्याने ते परत आल्यावर रुग्णसंख्या वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

पालिका सज्ज

गणेशोत्सव होऊन दहा दिवस होत आले आहेत. यादरम्यान कोकणात गेलेले नागरिक पुन्हा मुंबईमध्ये आले आहेत. त्यानंतरही अद्याप कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. त्यात वाढ झालेली नाही. पावसाळ्यात मुंबईमधून राज्याबाहेर जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. हे कामगार पुन्हा मुंबईत यायला आता सुरुवात होईल. त्यामुळे पालिका अलर्टवर आहे. नागरिकांना लागणारी औषधें, ऑक्सिजन, रुग्णालयातील बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत अशी माहिती काकाणी यांनी दिली.

7 लाख 41 हजार कोरोना रुग्ण

मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेल्या दीड वर्षात 7 लाख 471 हजार 617 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 7 लाख 18 हजर 336 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 16 हजार 91 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 4 हजार 702 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होणायचे परांजण 97 टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1 हाजर189 दिवस इतका आहे. मुंबईत एकही झोपडपट्टी कंटेंटमेंट झोन म्हणून सील नाही. मात्र, 52 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - Corona Update : राज्यात 2844 नवे रुग्ण, 60 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.