ETV Bharat / state

Nitesh Rane : मी फक्त म्याऊ म्याऊ केले तरी त्यांना घाम फुटतो; संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंचे उत्तर - भाजप आमदार नितेश राणे

संजय राऊत यांनी उत्तर दिल्यानंतर राऊतांच्या या उत्तराला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले असून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये काय इज्जत राहिली आहे ते त्यांनी पाहावे, अशी टीकाही नितेश राणे यांनी यावेळी केली. मी फक्त म्याऊ म्याऊ केलं तरी यांना घाम फुटतो, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत नाही तर आम्ही खरे वाघ असल्याचे म्हटले आहे.

भाजप आमदार
नितेश राणे
author img

By

Published : Jun 11, 2023, 2:54 PM IST

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल नांदेड येथील जाहीर सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. अमित शहा यांच्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिल्यानंतर राऊतांच्या या उत्तराला भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. राऊतांना उत्तर देताना नितेश राणे यांनी त्यांची हिंमत दाखवायाला सांगितली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे शिवडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचा मोठा गैप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे.

खरा वाघ कोण आहे? : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये काय इज्जत राहिली आहे का ते त्यांनी पाहावे. पूर्वी जी काही इज्जत होती, ती फक्त बाळासाहेब ठाकरे असताना होती. परंतु त्यांच्या निधनानंतर मातोश्रीकडे कोणीही फिरकत नाही. हल्ली सर्व बैठका शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी होत आहेत. खरा वाघ कोण आहे, ते जनतेला माहीत आहे. मी फक्त म्याऊ म्याऊ केले तरी यांना घाम फुटतो, असे सांगत नितेश राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.

प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत नाही : नितेश राणे म्हणाले आहेत की, अमित शहा यांनी उपस्थित केलेले जे मूळ मुद्दे आहेत त्याला उत्तर देण्याची हिंमत संजय राऊत यांच्याकडे नाही. हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली? कोणाचा राजकीय लव्ह जिहाद झाला आहे? यावर त्यांची बोलण्याची हिंमत नाही. ट्रिपल तलाकला हे पाठिंबा दिल्याचे म्हणत आहेत. परंतु सुप्रिया सुळेंनी ट्रिपल तलाक असायला पाहिजे, असे समर्थन दिले होते. समान नागरी कायदा आम्ही आणणारच, असे अमित शहा यांनी ठणकावून सांगितले आहे. परंतु यावर उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांच्याकडे उत्तर नाही. अयोध्यामधील राम मंदिरात जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अबू आझमी यांना घेऊन जाऊन तिथे महाआरती करण्याची हिमंत संजय राऊत यांच्यामध्ये आहे का? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे शब्दाला जागणारे नाहीत : उद्धव ठाकरे यांनी आयुष्यात कुणालाही दिलेला शब्द पाळला नाही. उद्धव ठाकरे यांचा कुणाला शब्द देण्याशी काहीही संबंध नाही. स्वतःच्या सख्ख्या भावाला दिलेला शब्द त्यांनी पाळला नाही. काही महिन्यापूर्वी ते मुख्यमंत्री असताना मुंबईतील फायर आजीच्या घरी गेले होते. तेव्हा तिच्या नातवाला नोकरी लावतो, असे सांगितले होते. परंतु आजही तो नोकरीपासून वंचित आहे. उद्धव ठाकरे फक्त पाटणकर, सरदेसाई व त्यांच्या घरी खोके पोहोचवण्याचे आणि वसुली करण्याचे काम करतात. त्यांना दिलेला शब्द पाळतात, असा खोचक टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

आदित्य ठाकरेंसाठी शिवडी मतदारसंघ : लोकसभेच्या कल्याण - डोंबिवली जागेवरून सध्या वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, या जागेवर बोलण्याचा संजय राऊत यांना काहीच अधिकार नाही. २०२४ ला वरळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढणार आहे. त्यामुळे तेथून आदित्य ठाकरे यांना बाहेर पडावे लागणार आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवडी विधानसभा मतदारसंघाची चाचपणी चालू असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले आहे. जिथे माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आपली सीट वाचवू शकत नाही. तिथे या सर्वांना कल्याण - डोंबिवली बद्दल बोलायचा काय अधिकार. त्याबद्दल आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही नितेश राणे म्हणाले.

हेही वाचा -

  1. Sanjay Raut on Amit Shah: कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून अमित शाह यांचे फक्त निवडणुकांवर लक्ष-संजय राऊत
  2. Nitesh Rane criticize Sanjay Raut : '..म्हणून संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार पाडले', नितेश राणेंचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.