मुंबई Nitesh Rane On Uddhav Thackeray : 10 जनपथचा अधिकृत पगारी नोकर संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्याचा मालक आमच्या नेत्यांना दिल्लीच्या ताटाखालचं मांजर बोलणं हा 2024 चा फार मोठा जोक असल्याचं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर राणेंनी टीका केली आहे. पुढे बोलताना राणे म्हणाले की, सकाळची चहा किंवा कॉफी प्यायची हे दिल्ली आणि जनपथच्या आदेशानुसार काही करत नाही. त्यांनी दुसऱ्यांवर बोट ठेवायचं हे आश्चर्य वाटण्यासारखं आहे. काँग्रेस यात्रेत व्यग्र असल्यामुळं उद्धव ठाकरे जुळवाजुळीचं काम करत आहेत. त्यामुळं 10 जनपथमध्ये 2 नवीन कारकून नेमले आहेत. तसंच भलामण करण्याचा उच्चांक म्हणजे काय, हे अनुभवायचं असेल तर आजचा एका वृत्तपत्रातील अग्रलेख वाचावा असंही त्यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना सल्ला : प्रत्येक वेळी राम मंदिराच्या उभारणीला काँग्रेस पक्षाने विरोध केला. रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांना राम मंदिराचं श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखा विषय असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलंय. ज्यांनी देवतांच्या अस्तित्वाला प्रश्न निर्माण केला. त्यांना राम मंदिराचं श्रेय दिल जातंय असं असलं तर तुमच्या सारखे चायनीज मॉडेल हिंदू धर्मला नको. यापेक्षा अधिकृत त्या काँग्रेस सेवा दलाची टोपी घाला आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पुढे सलाम ठोकण्यासाठी उभं राहा असा सल्ला, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना दिलाय.
महायुती मुंबईचा विकास करणार : महानंदा डेरी असो किंवा महालक्ष्मी रेस कोर्स असो विकासाची जबाबदारी महायुती सरकारवर आहे. महानंदा डेअरीबाबत अफवा पसरवण्याचं काम 'बेबी पेंग्विन' आणि राऊत करत असल्याचा आरोप राणे यांनी केलाय. मुंबईचा विकास ठाकरे कुटुंब करू शकले नाही. मात्र महायुती सरकार करून दाखवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
मुख्यमंत्री असताना प्रश्न सोडवले नाही : गुजरातींचे ग्लास पुसून ज्यांची संध्याकाळ निघते त्या 'बेबी पेंग्विन' आणि संजय राऊत यांना रोज सकाळी गुजरातवर आक्षेप कशाला? रोमिल छेडा, पुण्य पारेख, राहुल गोम्स, चतुर्वेदी चालतात पण आमचा लालबागचा मराठी माणूस दिसत नाही. कोव्हीडच्या नावाखाली तुम्हाला भ्रष्टाचार करायला जमलं पण मुख्यमंत्री असताना अंगणवाडी सेविकांचा प्रश्न का सोडवला नाही? असाही प्रश्न राणे यांनी उपस्थित केलाय. आमचे नेते योग्य निर्णय घेतील आम्हाला उद्धव ठाकरे नावाच्या विदूषकाची गरज नाही.
पर्यटनमंत्र्यांमुळे प्रकल्प बाहेर गेला : हिट अँड रन कायद्यासंदर्भात जनतेसोबत आमचा योग्य संवाद आहे. म्हणून काल आम्ही पाऊल उचलले. त्या कायद्याचे उद्दिष्ट योग्य होतं. जनतेचं ऐकणारं राज्य आणि केंद्र सरकार आहे. पाणबुडी प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे शिवाय कोणी जबाबदार नाही. नाकर्ता पर्यटन मंत्री मिळाला म्हणून प्रकल्प रखडला. प्रकल्प बाहेर जाण्यास आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाच्या पाठीवर आपल्या देशाला विकसित भारत उभा केला आहे. त्याचा अभिमान वाटायला हवा, मात्र पाकिस्तानची भूमिका उबाठावाले चांगल्या प्रकारे राबवित असल्याचा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केलाय. ज्याप्रकारे मोदी द्वेष पाकिस्तानमध्ये दिसतो, त्या प्रकारचा द्वेष उबाठा करत आहे.
उद्धव ठाकरे यांनी धुतराष्ट्राच्या भूमिकेतून बाहेर यावे : कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच आमचे राम असल्याचं कर्नाटकामधील काँग्रेस नेत्याने विधान केलं आहे. याला उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, ज्यांचा हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. त्यांचं नाव राम देवतेसोबत जोडत असाल तर हा आमच्या देवतांचा अपमान आहे. तसंच सुषमा अंधारे यांनी सरपंच पदाची निवडणूक लढावावी मग आपण मोठ्या बाता करू. तसंच अंधारे आणि संजय राऊत निवडणूक न लढवणारे शाळेतील विद्यार्थी आहेत. त्यांनी निवडणुकीवर भाष्य करू नये असं आपल्याला वाटत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. 2019 सालीच भाजपासोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी ठरवलं होतं. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची तयारी होती. मात्र संजय राऊत फितूर निघाले. उद्धव ठाकरेंनी धृतराष्ट्रच्या भूमिकेतून बाहेर यावं. अन्यथा शिल्लक सेना गुंडाळण्याची वेळ संजय राऊत त्यांच्यावरती आणतील असा सल्लाही, नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय.
हेही वाचा -