मुंबई- कांदिवलीमध्ये हनुमान नगर येथे चाळीत राहणाऱ्या एका अठरा वर्षाखालील मुलाने बॉक्सिंग क्षेत्रात नवा जागतिक विक्रम निर्माण केला आहे. आशिष उपेंद्र असे त्या मुलाचे नाव असून त्याने एका मिनिटात तब्बल ४३४ पंच मारत नवा विक्रम निर्माण केला आहे.
प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देत सत्कार
आशिष उपेंद्र रजकने एका मिनिटांमध्ये तब्बल 434 बॉक्सिंगचे स्ट्रेट पंचेस मारुन एक जागतिक विश्वविक्रम केला आहे. म्हणूनच वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाचे सीनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये आशिष रजक आणि त्यांचे प्रशिक्षक श्री मनोज गौंड यांचा वर्ल्ड रेकॉर्डस् इंडियाने प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विश्वविक्रम करणाऱ्या आशिष रजकचे प्रशिक्षक श्री मनोज गौंड १८ वर्षांहून जास्त काळापासून मुलांना विविध प्रकारचे कराटे मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून आशिषचे स्वप्न होते की काहीतरी जागतिक स्तरावर वेगळे करून दाखवायचे ते आज स्वप्न त्यांनी एका मिनिटांमध्ये बॉक्सिंग चे 434 स्टेट पंचेस मारून पूर्ण केले.