मुंबई - लोकसभा निवडणुकीचे प्राथमिक कल दिसून येत असताना संयुक्त पुरोगामी आघाडीचे अपयश म्हणजे धर्मनिरपेक्ष शक्तींचा पराभव असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. मतमोजणीनंतर आलेल्या प्राथमिक कौलानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपेक्षेप्रमाणे जिंकला असून काँग्रेसला अंतर्गत बंडाळीचा फटका बसला आहे. या निवडणुकीनंतर सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र येऊन आत्मपरीक्षण करावे लागेल. गेल्या ५ वर्षात भाजपने देशांमध्ये जातीय विद्वेष पसरला आहे. हा उद्देश हा द्वेष दूर करून धर्मनिरपेक्ष ताकत नव्या दमाने उभारण्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावे लागतील, असेही नवाब मलिक म्हणाले.