ETV Bharat / state

Nawab Malik Arrested : नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कनेक्शन? 'या' प्रकरणात झाली अटक

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) ईडीच्या रडारवर होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (underworld don dawood ibrahim) मनी लाँड्रींग प्रकरणी (money laundering case) ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून त्यांच्यावर नजर होती. ईडीने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले काही तासांच्या तपासा नंतर त्यांना अटक झाली आहे.

मंत्री नवाब मलिक
author img

By

Published : Feb 23, 2022, 3:34 PM IST

Updated : Feb 24, 2022, 11:04 AM IST

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, मनी लाँड्रींग प्रकरणात जुन्या मालमत्तांच्या व्यवहारांप्रकरणी मलिकांची ईडीकडून चौकशी सुरू होती. सकाळी 7 वाजल्यापासून त्यांची चौकशी झाली पहाटेच ईडीचे पथक मलिकांच्या घरी धडकले होते. मलिकांनी यापूर्वी अनेकदा ईडीचे अधिकारी आपल्या घरी छापा टाकणार असल्याचे म्हटले होते. कोणत्याही कारवाईचा सुगावा लागल्यानंतर ते जाहीरपणे त्याची उघडणी करतात. परंतु आज अचानकपणे ईडीच्या कार्यालयात नवाब मलिक दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. दुपारी 3 नंतर ते बाहेर आले त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे त्याच वेळी त्यांना ईडीने अटक केल्याचे स्पष्ट झाले.

दाऊदच्या मालमत्तेचे व्यवहार रडारवर
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची चर्चा सुरु होतीच. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे.

नवाब मलिकांवरील आरोप
नवाब मलिकांवरील आरोप

फडणवीसांनी केले होते आरोप
9 नोव्हेंबर 2021 रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा खळबळजनक खुलासा केला होता. नवाब मलिक यांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले होते. या जमिनी मुंबई बाॅंम्ब स्फोटाच्या आरोपींच्या मालकीच्या आहेत. सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांचे निकटवर्तीय सलीम पटेल यांचे नवाब मलिक यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप फडणविसांनी केला होता. या दोघांनी मुंबईतील एलबीएस रोडवरील कोटय़वधींची जमीन मलिक यांच्या नातेवाईकाच्या एका कंपनीला विकल्याचे म्हणले होते.

3 एकर जमीन केवळ 20-30 लाखांना विकली
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार ही जमीन सरदार शाह वली खान आणि सलीम पटेल यांनी विकली होती. नवाब मलिकही काही काळ या कंपनीशी संबंधित होते. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील 3 एकर जमीन केवळ 20-30 लाखांना विकली गेली, तर त्या जमीनीची बाजारभावा नुसारची किंमत 3.50 कोटींहून अधिक होती. माजी मुख्यमंत्र्यांनी सर्व पुरावे केंद्रीय यंत्रणांना देणार असल्याचेही बोलले होते. याच प्रकरणात कारवाई करताना ईडीच्या पथकाने मलिकांना चौकशीसाठी नेले असावे असे बोलले जात होते. यावर ईडीकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेले नव्हती.

कुर्ल्यातील जागाही खरेदी केल्याचा आरोप
1993 च्या बाॅंम्बस्फोटातील आरोपी कड़ून नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांनी खरेदी केल्याचा आरोप आहे. त्यांनी कुर्ल्यांताल मोक्याची तीस एकर जागा तीस लाख रुपयांत खरेदी करुन केवळ 20 लाख रुपये दिल्याचा आरोप आहे. मलिक यांच्या सेलिडस या कंपनीने 2005 मध्ये सलीम पटेल आणि शहावली यांच्या सोबत व्यवहार केल्याचा आरोप आहे. कुर्ला येथील जमिनीचा भाव 2005 मध्ये 2053 रुपये होता. मात्र मलिकांनी 25 रुपये चौैरस फूट दराने खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या जमिनीचे वाटप मुखत्यारपत्र सलीम पटेल यांच्याकडे आहे मात्र विक्री सरदार शहावलींच्या नावाने करण्यात आली. तर या जमीन खरेदीच्या कागदपत्रावर फराज मलीक यांची सही असल्याचे दिसते असेही त्यांच्यावर आरोप आहेत.

हेही वाचा : Leaders on ED's Radar: महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या या नेत्यांविरुध्द ईडीचे शुक्लकाष्ठ

Last Updated : Feb 24, 2022, 11:04 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.