हैदराबाद - नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा विशेष कार्यक्रम महाराष्ट्राच्या नवदुर्गा कार्यक्रमात पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त (COP) आणि महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक (Legal & Technical) डॉ. मीरा चड्ढा बोरवणकर यांनी सहभाग घेतला. यावेळी 'ईटीव्ही भारत'ने मोरवणकरांच्या घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या पोलीस सेवेतील कारकिर्दीला उजाळा दिला. तसेच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी महिलांना, युवतींना मोलाचा असा संदेश देत महिलांनी स्वत:ला कधीही कमू समजू नये, सकारात्मक राहावे, असा सल्लाही दिला.
प्रश्न - बालपण, घरातील वातावरण, पोलीस सेवेतील सुरुवात याबद्दल काय सांगाल?
उत्तर - माझे वडील पंजाब पोलीसमध्ये सेवेत होते. आई लग्नाअगोदर शिक्षिका होती. आईने घरात अतिशय शिस्तीचे वातावरण होते. अभ्यासावर भर द्या. शाळेतून आल्यावर आधी होमवर्क करा आणि मगच बाहेच खेळायला जा, अशी तिची शिकवण होती. यामुळे भविष्याबद्दलची जाण फार आधीच आली. यामुळे पर्सनॅलिटी स्पोर्ट क्षेत्राला अनुसरुन असल्यामुळे पंजाब पोलीसमध्ये असलेल्या घोडेसवारीलाही मी जायचे. एक-दोन वेळा मी पडलेही होते. मला आवड होती. यानंतर मला स्कुटर चालवायची फार इच्छा होती. 1970मध्ये आम्ही दोन मुली शाळेत स्कुटीवर यायच्या. वडील फार महत्त्वाकांक्षी होते. आम्ही फार मोठ्या क्षेत्रात जाव्यात, ही त्यांची इच्छा होती. यामुळेच माझी बहीण आयकर विभागात मोठ्या पदावर गेल्या आणि मी पोलीस सेवेत आली. घरचे वातावरण बॅलन्स्ड ठेवा. उदा. माझे वडील फार महत्त्वाकांक्षी आणि आई फार शिस्तप्रिय. आपला फोकस कशावर आहे, हे मुलांना समजले पाहिजे. यामध्ये आई-वडील चांगले मार्गदर्शन करू शकता. मुलामुलींनी आईवडिलांचे ऐकले पाहिजे.
प्रश्न - पोलीस सेवेतील एवढ्या मोठ्या कारकिर्दीत तुम्हाला लाच देण्याचा प्रयत्न झाला?
उत्तर - दबाव आणण्याचे प्रयत्न झाले. मात्र, प्रशिक्षणादरम्यानच दबाब झुगारण्याबाबत प्रशिक्षण दिले जाते. मला लाच घेण्याबाबत तीन वेळा दबाव नव्हे तर सल्ला देण्यात आला. मी कोल्हापुरला Additional SP असताना, पाटील नावाचे डीवाएसपी होते. ते म्हणाले, मॅडम आपण जेव्हा पैसे घेतो त्या पैशांची शेती विकत घ्यायची. मी त्यांना म्हणाली, कोणते पैसे? तर ते म्हणाले की मॅडम, पगार नाही तर दुसरा पैसा. यानंतर मी त्यांना म्हणाली, मी याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही. मग ते यानंतर बोलले नाही. तसेच ज्यावेळी मी डीसीपी झोन 4 होते, त्यावेळी एक अधिकारी मला म्हटले, मॅडम पाहा, माटुंगा, दादर, चेंबूर या भागातून उद्योजक आम्हाला व्यापारी पैसे देतात. आम्ही काही त्यांचे काम करत नाही. हा गुडविलसारखा पैसा आहे. तुम्ही नाही घेतला तरी हा थांबणार नाही. नंतरमी त्यांना यात मी इंडरेस्टेड नाही, असे सांगितले. यानंतर जेव्हा मी मुंबईला गुन्हे शाखेत Joint CP होते, तर एक माझे ओळखीचे फार वरिष्ठ अधिकारी म्हणाले. बोरवणकर तुम्ही याप्रकारचे पैसे न घेऊन दर महिन्याला एक कोटी रुपये गमावत आहेत. 2004मधील ही गोष्ट आहे.
प्रश्न - तुमच्या करिअरमधील जळगाव सेक्स स्कँडल प्रकरण काय होते?
उत्तर - यातील मुख्य मुद्दा असा की, महाराष्ट्रात तेव्हा आयपीएस महिला अधिकारी नव्हत्या. त्यात जळगावला एकच महिला एएसआय होत्या. यामुळे जळगावच्या घटनेनंतर अशी चर्चा व्हायला लागली की, 100पेक्षा जास्त मुलींवर अत्याचार झाले. यातील आरोपी मोठ्या लोकांचे पाठबळ आहे. त्याला माझा मुलगा लहान होता. मी त्यावेळी पुणे सीआयडीमध्ये कार्यरत होते. यावेळी मला शासनाचा आदेश आला की, जळगावला जायचे आहे. मी जवळपास एक वर्ष तिकडे राहिले. मुलींनी तक्रार उशीरा केल्यामुळे कोर्टात ही केस विक ठरली. आरोपी मुलींच्या शाळेत प्रमुख अतिथी म्हणून जायचे. यामुळे तरुण मुली त्यांच्याकडे आकर्षित व्हायच्या. यानंतर मुलींना लग्नाचे आमिष दिले जायचे. यानंतर सेक्सुअल रिलेशनशिपचे चित्रीकरण करुन मुलींना ब्लॅकमेल केले जायचे. मुली आईवडीलांना काहीच बोलू शकल्या नाही. जर मुलींनी वेळीच पोलिसांकडे तक्रार केली असती, तर याप्रकाराला आपण अगोदरच थांबवू शकलो असतो. कम्युनिशन गॅपमुळे मुलींना भीती होती, पालकांना सांगितल्यावर आमची शाळा बंद होईल. याप्रकरणाचा तपास केल्यानंतर आम्ही सेशन कोर्टात आरोपींनावरील आरोप सिद्ध करुन दाखवले. टीमवर्कमुळे प्रकरणाचा तपास झाला. याप्रकरणात पुण्यातील एनजीओंचीपण आम्हाला मदत झाली.
प्रश्न - नवरात्रीच्या निमित्ताने महिलांना, तरुणींना संदेश -
उत्तर - तरुणींनी आपल्या आयुष्यात मोठे होण्याबाबत महत्त्वाकांक्षी असले पाहिजे. अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी सांगितले पाहिजे की हो, मला आयपीएस, आयएस, एअर होस्टेस व्हायचंय. सकारात्मक राहिले पाहिजे. स्वत:ला, मित्रपरिवाराला सकारात्मक संदेश द्या. तिसरा मुद्दा असा की, आनंदी राहणं हा माझा अधिकार आहे, असं समजायला हवं. मुलांना असं वाटतं की, आनंदी राहणं हा त्यांचाच अधिकार आहे. मात्र, मुलींनीही आनंदी राहायला हवं. लग्नानंतर त्यांना मुलांची आनंद महत्त्वाचा वाटतो. स्वत:कडे त्या दुर्लक्ष करतात. तसं करु नये. आणि शेवटचं म्हणजे, आपण जे आहोत ते आहोत. जसे आहोत तसे स्वत:ला स्विकार करा. त्याचा स्वत:ला अभिमान वाटू द्या. नवरात्रीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद.