मुंबई - भांडुप येथे राहणाऱ्या एका महिलेचा गळा चिरून तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव रतन बेन मोहनलाल जैन (वय ७०) असे असून, ती महिला येथील फुगावाला कम्पाउंड परिसरात एकटीच राहत होती. दरम्यान, या महिलेच्या अंगावरील सुमारे 3 लाख 50 हजार रुपयांच्या सोन्याची लूटही यावेळी केली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तपास केला असून, दोन संशयितांना अटक केली आहे.
250 कुटुंबांसह 500 लोकांची पोलिसांकडून चौकशी
रतन बेन मोहनलाल जैन या 1993पासून या घरात एकट्याच राहत होत्या. परिसरातील लोकांना लहान-मोठी रक्कम व्याजाने द्यायचा त्यांचा व्यवसाय होता. तसेच, त्या खाखरा विक्री करत असल्यामुळे अनेक लोकांशी त्यांचा संपर्कही होता. 15 एप्रिल रोजी त्या घरात एकट्या असताना, त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. यावेळी, हत्या करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या अंगावरील चेन, दोन बांगड्या, कर्णफुले, नाकातील फुलं असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. यामध्ये परिसरातील 250पेक्षा अधिक कुटुंब आणि बेन यांच्या संपर्कात असलेल्या सुमारे 500 लोकांची चौकशी केली. तसेच, बेन यांच्याकडून व्याजाने रक्कम घेणाऱ्या लोकांचीही यामध्ये चौकशी करण्यात आली. दरम्यान, यातील संशयित बिजनौर हा उत्तर प्रदेश येथे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनात आले. त्यानंतर या संशयितांच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशला पाठवण्यात आले होते. याप्रकरणी एक पुरुष आणि एक महिला असे दोन संशयित अटक करण्यात आले आहेत. यांच्याकडून चोरी केलेल्या बांगड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून, मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचे पाप महाविकास आघाडीने केले - देवेंद्र फडणवीस
वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या, दोन संशयितांना अटक
भांडुप येथे राहणाऱ्या एका महिलेचा गळा चिरून तीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव रतन बेन मोहनलाल जैन (वय ७०) असे असून, ती महिला येथील फुगावाला कम्पाउंड परिसरात एकटीच राहत होती.